S M L

बालशौर्य पुरस्कार विजेता जळगावचा निलेश भिल दुसऱ्यांदा गेला पळून

जळगाव मुक्ताईनगरमध्ये निलेश भिल दुसऱ्यांदा बेपत्ता झाला आहे. निलेश हा राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेता आहे.

Updated On: Dec 7, 2018 09:19 AM IST

बालशौर्य पुरस्कार विजेता जळगावचा निलेश भिल दुसऱ्यांदा गेला पळून

इम्तियाज अहमद, प्रतिनिधी

जळगाव, 07 डिसेंबर : जळगाव मुक्ताईनगरमध्ये निलेश भिल दुसऱ्यांदा बेपत्ता झाला आहे. निलेश हा राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेता आहे. गेल्या मे महिन्यात निलेश बेपत्ता झाला होता आणि आताही त्याचा काहीच पत्ता लागत नसल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूरच्या आश्रमातून निलेश पळाला असल्याचं सांगण्यात येत आहे. कोथळी गावातील या मुलाचा 2015 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत करण्यात गौरव करण्यात आला होता. 2017लाही निलेश घरातून पळून निलेश गेला होता. तेव्हा तो त्याच्या भावालाही घेऊन गेला असल्याची तक्रार त्याची आईने पोलिसांत नोंदवली होती.


निलेशचं शैक्षणिक पुनर्वसन करण्यासाठी सरकारनं त्याला बऱ्हाणपूरच्या गोकुळ आश्रमात ठेवलं होतं. पण मंगळवारी खिडकीतून उडी मारून निलेश पळून गेल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर मी आजोबाला भेटण्यासाठी जातो असल्याचं निलेशने आश्रमातील मित्रांना सांगितलं होतं.

या संपूर्ण प्रकाराची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आता निलेशचा शोध घेत आहेत. तर मागे एकदा 17 मे रोजी निलेश असाच त्याच्या घरातून पळून गेला होता. तेव्हा निलेश 12 वर्षांचा होता तर त्याच्यासोबत त्याचा 7 वर्षांच्या लहान भाऊ गणपतदेखील होता. त्यावेळीही पोलिसांत त्याची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

तर मुक्ताईनगरमधल्या एका मंदिरासमोर भाविकांसाठी तयार करण्यात आलेल्या घाटात भागवत घोगले हा मुलागा पडला होता. त्यावेळी स्वत:चा जीव धोक्यात टाकून निलेशने या मुलाचा जीव वाचवला होता. त्याच्या याच धाडसी कामाची दखल घेत त्याला 26 जानेवारी 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार बालशौर्य प्ररस्कार देण्यात आला होता.

Loading...


VIDEO: गाढ झोपेत असताना घराबाहेर धगधगत होत्या त्यांच्या गाड्या


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2018 09:18 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close