S M L

नाशिकमध्ये फुगा घशात अडकल्याने चिमुकल्याचा मृत्यू !

नाशिकमध्ये फुगा घशात अडकल्याने एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. वीर विनोद जैयस्वाल असं या चिमुकल्याचं नावं आहे. या घटनेमुळे नागरिकांनी आपल्या चिमुकल्यांच्या हातात फुगा देताना विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे

Chandrakant Funde | Updated On: Aug 11, 2017 05:42 PM IST

नाशिकमध्ये फुगा घशात अडकल्याने चिमुकल्याचा मृत्यू !

नाशिक, प्रतिनिधी,10 ऑगस्ट : नाशिकमध्ये फुगा घशात अडकल्याने एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. वीर विनोद जैयस्वाल असं या चिमुकल्याचं नावं आहे. तो अवघा 8 महिन्याचा होता. सिडको भागात ही दुर्दैवी घटना घडलीय. त्याचं झालं असं की, या चिमुरड्याने खेळता खेळता हातातला फुगा तसाच तोंडात घातला आणि गिळला. पण त्यानंतर तोच फुगा घशात चिटकून बसल्यामुळे मुलाचा श्वास कोंडला. हा प्रकार घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला रुग्णालयात दाखलं केलं पण तोपर्यंत चिमुड्याचा जीव गेला.

खरंतर हाच फुगा आईने तो गिळण्याआधी त्याच्या हातून फेकला देखील होता. पण नंतर ती कामात गढून गेल्याने यामुलाने तो पुन्हा तोंडात घातला. आणि त्यातूनच त्याचा करूण अंत झाला.

या घटनेमुळे सिडकोतील या हनुमान नगर भागातील सगळेच रहिवासी पुरते हादरलेय. कारण जवळपास प्रत्येकाच्याच घरात लहान मुल असतं.


या घटनेतून धडा म्हणून आता नागरिकांनी आपल्या चिमुकल्यांच्या हातात फुगा देताना विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2017 04:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close