दंड भरायला सांगितला म्हणून तरुणीनं वाहतूक पोलिसाच्या कानशिलात भडकावली

नाशिकमध्ये पुन्हा एकदा वाहतूक पोलिसाला महिलेकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2017 05:06 PM IST

दंड भरायला सांगितला म्हणून तरुणीनं वाहतूक पोलिसाच्या कानशिलात भडकावली

18 जुलै : नाशिकमध्ये पुन्हा एकदा वाहतूक पोलिसाला महिलेकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. दंड भरायला लावला म्हणून एका महिलेनं वाहतूक पोलिसांच्या कानशिलात लगावली.

शहरातील एसबीएस सिंग्नलवर वाहतूक सिंग्नलच्या नियमाचे उल्लंघन केल्याने ड्युटीवर कार्यरत असणाऱ्या युवराज गायकवाड या पोलिसाने एका तरुण दाम्पत्याची गाडी अडवली होती. कागदपत्र आणि वाहतूक परवाना विचारल्यानंतर या तरुणीच्या दुचाकी चालवणाऱ्या युवकाला 200 रुपये दंड भरण्यास वाहतूक पोलिसानी सांगितलं. याच गोष्टीचा राग आल्याने गाडी मागील बसलेल्या तरुणीनं थेट गायकवाड यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली.  या तरुणीने गायकवाड यांना शिवीगाळ केली आणि कानशिलात लगावली. गायकवाड यांच्या सहकाऱ्याने या तरुणीचा प्रताप मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकाॅर्ड करण्यास सुरुवात केली तर त्यांच्याही अंगावर ही तरुणी धावून गेली.

केवळ वाहतूक नियमाचा दंड भरण्याच्या कारणावरून या वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आलीये. मारहाण करणाऱ्या या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2017 04:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...