S M L

पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाची भररस्त्यावर हत्या

भरदिवसा रस्त्यावर घडलेल्या हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated On: Aug 22, 2018 06:21 PM IST

पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाची भररस्त्यावर हत्या

कपिल भास्कर, नाशिक, 22 आॅगस्ट : नाशिकरोड भागातील एकलहरे परिसरात अनैतिक संबंधातून संदीप मरसाळे या युवकाची कुर्‍हाडीने वार करून हत्या झाल्याची घटना घडलीये. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संशयाचे भूत जेव्हा मानगुटीवर बसते तेव्हा काय अनर्थ होऊ शकतो याचा काही नेम नाही. नाशिकरोड भागातील एकलहरे परिसरात दीपक पगार आपल्या पत्नीसोबत राहत होता. याच परिसरातील मयत संदीप मरसाळे या तरुणाने दीपक पगारच्या पत्नीशी जवळीक साधली. त्यामुळे दीपकला संदीपवर संशय बळावला. आपल्या पत्नीसोबत याचे अनैतिक संबंध असल्याची बाब दीपकला खटकली. याचा राग धरून दीपकने संदीप मरसाळेचा काटा काढण्याचं ठरवलं.

आज दुपारी दिवसाढवळ्या भररस्त्यात कुऱ्हाड घेऊन दीपकने संदीप मरसाळेवर भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यात संदीप मरसाळेचा मृत्यू झाला.

संशयित आरोपी दीपक पगार याला काही वेळातच नाशिकरोड पोलिसांनी ताब्यात घेतलंय. संशयित आरोपी दीपक पगार ह्याच्या पत्नीचे संदीप मरसाळे सोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हत्या झाल्याचं पोलिसांचं सांगितलं.

भरदिवसा रस्त्यावर घडलेल्या हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...
Loading...

सनी लिओनीची लव्ह स्टोरी, 'या' व्यक्तीच्या पडली प्रेमात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 22, 2018 06:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close