• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नाशिकची 'लेडी सिंघम', दरोडेखोरासोबत एकटीने दिली झुंज
  • VIDEO : नाशिकची 'लेडी सिंघम', दरोडेखोरासोबत एकटीने दिली झुंज

    News18 Lokmat | Published On: May 31, 2019 01:34 PM IST | Updated On: May 31, 2019 01:34 PM IST

    नाशिक, 31 मे : नाशिकमधील स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात चाकूचा धाक दाखवून रोकड लुटणारा आरोपी गजाआड झाला आहे. महिलेनं दाखवलेल्या धाडसानं लुटमारीचा डाव उधळला गेला. भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात महिलेस चाकूचा धाक दाखवून रोकड लुटणाऱ्या संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. संशयिताच्या ताब्यातून दुचाकीसह मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे. ही घटना सातपूर औद्योगिक वसाहतीतील अशोकनगर भागात घडली होती. सविता मुर्तडक यांनी दरोडेखोराला न घाबरता झुंज दिली, याबाबत आता सर्वच स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी