नाशिकमध्ये थरार; दरोडेखोरांचा पोलिसांवर गोळीबार, एक जण जखमी

नाशिकमध्ये थरार; दरोडेखोरांचा पोलिसांवर गोळीबार, एक जण जखमी

नाशिकमध्ये रात्री सराफाच्या दुकानावर दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

मनमाड, 28 मार्च: नाशिकमध्ये रात्री सराफाच्या दुकानावर दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी दरोडेखोर आणि पोलीस यांच्यात जोरदार चकमक झाली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला. तर चौघांना पकडण्यात यश आले आहे.

नाशिक शहराजवळच्या आडगावमध्ये एका सराफा दुकानावर 6 जणांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस घटनास्थळी वेळेवर दाखल झाले. पोलिस आल्याचे पाहताच दरोडेखोरांनी इंडिका कारमधून पळ काढला. पोलिसांनी देखील दरोडोखोरांचा पाठलाग केला. पोलिस मागावर असल्याचे समजताच एका दरोडेखोराने पोलिसांवर गोळीबार केला. यावर पोलिसांनी दिलेल्या प्रतिउत्तरात एक दरोडेखोर जखमी झाला.

पोलिसांना 4 दरोडेखोरांना पकडण्यात यश आले असून अन्य दोघे जण फरार झाले आहेत.


VIDEO: ट्रॅफीकमुळे पार्थ पवारांना झाला उशीर, पाहा काय केलं



बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: nashik
First Published: Mar 28, 2019 10:49 AM IST

ताज्या बातम्या