VIP मोबाईल नंबर देणारं रॅकेट उद्ध्वस्त; नेते,अभिनेत्यांना कोट्यवधींचा गंडा

एअरटेल कंपनीचा VIP मोबाईल नंबर देतो असं सांगून ही मंडळी अनेकांना आपल्या जाळ्यात ओढत होती. बँक खात्यात पैसे जमा करा असं सांगत ही टोळी ऑनलाईन पैसे जमा करायला सांगायची, पैसा जमा झाले की नंबर मिळेल असं अमिष दाखवलं जात होतं.

News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2019 04:33 PM IST

VIP मोबाईल नंबर देणारं रॅकेट उद्ध्वस्त; नेते,अभिनेत्यांना कोट्यवधींचा गंडा

प्रशांत बाग, नाशिक 2 ऑगस्ट :  नाशिक पोलिसांना मोठं यश मिळालंय. VIP मोबाईल नंबर देतो असं सांगून या टोळीनं अनेक बड्या आसामींना कोट्यवधींचा गंडा घातल्याचं उघड झालंय. आपला मोबाईल नंबर आकर्षक असावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी काही हौशी मंडळी वाट्टेल ती किंमत द्यायलाही तयार होतात. ही क्रेझ लक्षात घेऊन अशा मंडळींची लुबाडणूक करणारी एक टोळी तयार झाली होती. त्याबाबात तक्रारी आल्यानं सायबर सेलच्या मदतीने नाशिक पोलिसांनी त्याचा छडा लावला आणि या टोळीला जेरबंद केलं.

'शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं, करावं तसं भरावं लागतं'

एअरटेल कंपनीचा VIP मोबाईल नंबर देतो असं सांगून ही मंडळी अनेकांना आपल्या जाळ्यात ओढत होती. यात अनेक अभिनेते, माजी मंत्री, राजकारणी, व्यावसायीक अशा अनेकांना या टोळीने फसवलं. बँक खात्यात पैसे जमा करा असं सांगत ही टोळी ऑनलाईन पैसे जमा करायला सांगायची पैसा जमा झाले की नंबर मिळेल असं अमिष दाखवलं जात होतं. मात्र पैसे जमा झाल्यानंतर त्यांचा काहीच पत्ता लगात नसे.

धक्कादायक : नाशिकमधून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींचं अपहरण

अभिनेता विधू दारासिंग याने पोलिसांना माहिती दिली होती. विधू यांच्या मित्राची फसवणूक झाल्याने त्यांना याबाबत संशय आला होता. या टोळीने वेगवेगळ्या 17 बँक खात्यातून 1 कोटी 6 लाखाची फसवणूक केल्याचं उघड झालंय. फसवणूकीचे विविध 12 गुन्हे दाखल असलेला शरद पगार हा या टोळीचा प्रमुख आहे.

Loading...

जस्ट डायल चा खुबीनं वापर करून या टोळीने फसवणूक केल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. या टोळीतल्या 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय तर 2 जण फरार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2019 04:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...