News18 Lokmat

नाशिकमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; स्फोटकं जप्त

नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 17, 2019 11:03 AM IST

नाशिकमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; स्फोटकं जप्त

नाशिक, 17 मार्च : सटाणा - सुरत मार्गावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर जिलेटीन कांड्या आणि डिटोनेटर स्फोटकांचा साठा बोलेरो जीपमधून जप्त करण्यात आला आहे. सटाणा - सुरत मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान ही कारवाई केली. यामध्ये 2150 जिलेटीन कांड्या आणि 1750 डिटोनेटर जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आला असून एक जण फरार आहे. अटक केलेला आरोोेोेपी हा राजस्थानचा रहिवासी आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर केलेली ही राज्यातील दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी देखील पालघरमध्ये मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त करण्यात आली होती. दरम्यान, सटाणा येथे पकडलेल्या स्फोटकांबाबत सध्या तपास सुरू आहे.


पालघरमध्ये देखील मोठी कारवाई

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं 8 मार्च रोजी मोठी कारवाई केली होती. बोईसर-चिल्हार फाटा येथे पालघरच्या बोईसर स्थानिक गुन्हे शाखा युनिटने जिलेटिन आणि डिटोनेटरनं भरलेले दोन टेम्पो जप्त केले होते.

गुजरातहून हे दोन्ही टेम्पो आले होते. दरम्यान चेक नाका असताना देखील टेम्पोतून स्फोटकं आणली कशी? असा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रकरणामध्ये दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. यापूर्वी देखील पालघरमध्ये 24 डेटोनेटर आणि अमोनियम नायट्रेट सापडलं होतं.

Loading...


मुंबईत सफाई कामगार गुदमरले; एकाचा मृत्यू, 4 गंभीर


देशात हाय अलर्ट

यापूर्वी कर्जत एसटीमध्ये देखील बॉम्ब सदृश्य वस्तु सापडली होती. शिवाय, मुंबई एअर इंडियाला देखील धमकीचा फोन आला होता. त्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आलं होतं.


SPECIAL REPORT: 'चौकीदार चोर है' म्हणणाऱ्या राहुल गांधींना मोदींनी असं दिलं उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2019 11:02 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...