S M L

हरभऱ्याचा दाणा घशात अडकल्यामुळे एका वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

नाशिकच्या अंबड भागातल्या या घटनेनं हळहळ व्यक्त होतेय.

Sachin Salve | Updated On: Feb 16, 2018 11:06 PM IST

हरभऱ्याचा दाणा घशात अडकल्यामुळे एका वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

16 फेब्रुवारी : हरभऱा खाताना एक दाणा श्वसनलिकेत अडकल्यामुळे एक वर्षाच्या  मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशकात घडलीय. सुजय बिजूटकर अस जीव गमावलेल्या मुलाचं नाव आहे.

नाशिकच्या अंबड भागातल्या या घटनेनं हळहळ व्यक्त होतेय. सुजय बिजूटकर हरभरे खात असताना एक दाणा त्याच्या श्वसनलिकेत अडकला. श्वास गुदमरल्यामुळे सुजयला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मात्र, डॉक्टर त्याचे प्राण वाचवू शकले नाही. दरम्यान या घटनेमुळे पालकांनी त्यांच्या लहान मुलाकडे लक्ष ठेवण्याची अधिक गरज असल्याचं अधोरेखित केलंय. कारण याआधी नाशिकमध्ये 10 रुपयाचं नाणं आणि फुगा गिळल्यानं मुलांचा मृत्यू झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 16, 2018 11:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close