नाशिक मुथूट फायनान्स दरोडा प्रकरणात 1 संशयित ताब्यात

Nashik Muthoot Finance Robbery : पोलिसांनी आणखी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2019 09:43 AM IST

नाशिक मुथूट फायनान्स दरोडा प्रकरणात 1 संशयित ताब्यात

नाशिक, 25 जून : नाशिकमध्ये मुथूट फायनान्स दरोडा प्रकरणात पोलिसांना दुसरं यश मिळालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. तर, इतर 4 आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांच्या शोधासाठी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये पथकं रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान काल ( सोमवारी ) पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सुत्रधार जितेंद्र बहादूर सिंग याला सुरतमधून अटक केली आहे. तर, उर्वरित आरोपींना लवकरच पकडू अशी माहिती यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे – पाटील यांनी दिली होती. त्यानंतर आता दुसरं देखील यश मिळालं असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. या दरोडा प्रकरणात पोलीस दरोडेखोरांचा कसून शोध घेत आहेत.

भारताला मोठा दिलासा दिला, UAE दिले 'हे' आश्वासन!

सशस्त्र दरोडा

नाशिकमध्ये उंटवाडीतील परिसरात मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर गेल्वड्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. चार सशस्त्र दरोडेखोरांनी हा दरोडा टाकत बँकेत गोळीबारही केला होता. या गोळीबारात ऑडिटरचा मृत्यू झाला होता तर तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. ऑफिसमध्ये शिरल्यानंतर दरोडेखोरांनी गोळीबार केला. यामध्ये संजू सॅम्युअल नावाच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता तर यात 2 कर्मचारी जखमी झाले होते. दरोडेखोरांनी ऑफिसमधून मोठी मालमत्ता लंपास केली असल्याची माहितीही विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून देण्यात आली होती.

या प्रकरणी 15 जून रोजी सीसीटीव्हीच्या देखील तपासले गेले . त्यानंतर 3 मोटारसायकल, 3 हेल्मेट आणि एका व्यक्तीचा शर्ट पोलिसांच्या हाती लागला होता. नाशिकपासून 14 किलोमीटर अंतरावर रामशेज किल्ल्याजवळून गुजरातकडे जाणाऱ्या पेठ रोडवर गाड्या सापडल्या होत्या. सर्व शक्यतांचा विचार करून पोलिसांचा शोध सुरू आहे.

Loading...

VIDEO: मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे दीड तासासाठी बंद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: nashik
First Published: Jun 25, 2019 09:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...