Elec-widget

भाजप नगरसेवकांच्या अवैध होर्डिंग्सवर कारवाई करणारा अधिकारी निलंबित

भाजप नगरसेवकांच्या अवैध होर्डिंग्सवर कारवाई करणारा अधिकारी निलंबित

नाशिक महापालिकेचा अजब कारभार, प्रामाणिक अधिकाऱ्यालाच केलं निलंबित

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ,नाशिक 25 जून :  अनाधिकृत होर्डिंग लावल्याप्रकरणी नाशिकमधील भाजपच्या 4 नगरसेवकांविरोधात महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केला. मात्र या अधिकाऱ्याने कुठलीही परवानगी न घेता नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल केल्याचा ठपका ठेवत महापौरांनी या अधिकाऱ्याला भर महासभेत निलंबित केल्याचा अजब प्रकार घडला. या प्रकारामुळे नाशिककर संतप्त झाले आहेत.

नेहमी एकमेकांविरोधात टीका करणारे आणि वेळ आली तर हाणामारी देखील करणारे नाशिक महापालिकेतील्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी आज एकत्र येऊन महासभेत गोंधळ घातलाय आणि याला कारण ठरलंय ते म्हणजे एका अधिकाऱ्याने नगरसेवकांविरोधात केलेली कारवाई. प्रभाग क्रमांक 23 मधील भाजपचे नगरसेवक सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, रूपाली निकुळे आणि शाईन मिर्झा यांच्यावर रमजान ईद दरम्यान शहरातील सारडा सर्कल परिसरात अनधिकृत होर्डिंग लावल्याच्या कारणावरून महापालिका पूर्व विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला होता आणि याचाच राग मनात धरून या प्रामाणिक अधिकाऱ्यावर कारवाई करायला भाग पाडण्यात आलं.

संगनमताने कारवाई

अधिकाऱ्याने प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता ही कारवाई केल्याचा आरोप करत या अधिकाऱ्यांच निलंबन करण्याची संबंधित नगरसेवकानी महासभेत मागणी केली आणि या मागणीला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पाठिंबा देत सभागृहात एकच गोंधळ घातला. लोकप्रतिनिधींच्या या गोंधळानंतर नाशिक महानगरपालिकेच्या महापौर रंजना भानसी यांनी रवींद्र धारणकर यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करत त्यांना सभागृहातून बाहेर जाण्याचे आदेश दिले.

एरवी शांत वाटणाऱ्या महापौर ताईंचा हा रुद्रावतार बघून नाशिककरांना देखिल धक्काच बसलाय. शहरांच विद्रुपीकरण करणारे होर्डिंग्स तातडीने हटवा या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खरं तर अधिकारी चांगलं काम करताहेत. शहरातील अनेक क्लासेस, हॉटेल्स यांनी अनधिकृत होर्डिंग लावल्याने त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे मात्र नगरसेवकांवर आणि तेही सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांवर अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केल्याने त्यांचं थेट निलंबन केल्याने नाशिककर चांगलेच संतप्त झाले आहेत.

Loading...

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत मोहीम राबवताय तर दुसरीकडे भाजपचेच नगरसेवक शहराचे विद्रुपीकरण करत असून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलणाऱ्या धारणकरांसारख्या अधिकाऱ्यांना भाजपच्याच महापौरांनी निलंबित केलं त्यामुळे नाशिकरांनी संताप व्यक्त केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 25, 2019 09:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...