तुकाराम मुंढेंच्या 'या' निर्णयामुळे पहिल्यांदाच नाशिकमध्ये गणेशोत्सवात विघ्न!

नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेलं भालेकर मैदानावरील सार्वजनिक गणेशोत्सव यंदा वादात सापडला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2018 07:29 PM IST

तुकाराम मुंढेंच्या 'या' निर्णयामुळे पहिल्यांदाच नाशिकमध्ये गणेशोत्सवात विघ्न!

कपिल भास्कर, नाशिक, 08 आॅगस्ट : विघ्नहर्ता म्हणून ओळख असलेल्या गणपती बाप्पाचा गणेशोत्सव नाशिकमध्ये संकटात सापडला आहे, कारणं महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या एका निर्णयानंतर नाशिकमधील काही महत्वाच्या सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे आणि या मंडळांना शहरातील इतरही गणेश मंडळांनी पाठिंबा दिल्याने नाशिकमध्ये यंदा गणेशोत्सव साजरा होतो की नाही या संदर्भात साशंकता निर्माण झाली आहे.

नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेलं भालेकर मैदानावरील सार्वजनिक गणेशोत्सव यंदा वादात सापडला आहे. गेल्या 35 ते 40 वर्षांपासून या मैदानावर शहरातील 9 ते 10 महत्वाचे सार्वजनिक गणेश मंडळ गणपती बाप्पाची प्रतिष्ठापणा करतात. मात्र ह्या वर्षी ह्या जागेवर स्मार्ट सिटी अंतर्गत पार्किंगसाठी काम सुरू असल्याने,हे मैदान गणेशोत्सवासाठी देता येणार नाही अशी भूमिका महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतली आहे.

ही ऐतिहासिक जागा असून 40 वर्षांपासून आम्ही गणेशोत्सव याच जागेवर साजरा करत आहोत. त्यामुळे आम्हाला हीच जागा हवी आहे अशी भूमिका मंडळांनी घेतल्याने हा संपूर्ण वाद निर्माण झाला आहे. या जागेवर पार्किंगसाठी काम सुरू असलेतरी गणेशोत्सव आधी हे काम पूर्ण होऊ शकते.

त्यामुळे आयुक्तांनी दहा दिवसासाठी ही जागा आम्हाला द्यावी अशी मागणी मंडळांनी केली आहे. नाहीतर गणेशोत्सवावर बहिष्कार टाकण्याची भूमिका मंडळांनी घेतली अशी माहिती

संभाजी गणेश मंडळ अध्यक्षाचे गणेश बर्वे-राजे यांनी दिली.

Loading...

आतापर्यंत तुकाराम मुंढे यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत, भालेकर मैदानावर गणेशोत्सवसाठी परवानगी नाकारत मुंढे यांनी पुन्हा एकदा गणेशमंडळांचा रोष ओढून घेतला आहे. शहरातील इतर गणेश मंडळ देखील या निर्णयाने आक्रमक झाले असून बहिष्कार च्या भूमिकेत आहे.

नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच गणेशोत्सव वादात सापडल्याने आता यावर महापौर आणि आयुक्त काय भूमिका घेतात हे बघण्यासारखं राहणार आहे.

हेही वाचा

मराठा आरक्षणासाठी उद्या 'या' ठिकाणी बंद आणि इथं नाही !

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात बळीराजाची फसवणूक; परस्पर काढलं शंभर कोटींचं कर्ज

VIDEO : ठाण्यात फिरतोय विचित्र 'पिनमॅन', मुलांना का टोचतोय टाचण्या?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2018 07:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...