समृद्धी महामार्गाविरोधात नाशिकच्या शेतकऱ्यांची कोर्टात रीट याचिका

समृद्धी महामार्गाविरोधात नाशिकच्या शेतकऱ्यांची कोर्टात रीट याचिका

सध्या उपलब्ध असलेल्या महामार्गांवरच समृद्धी महामार्ग करण्यात यावा असंही या याचिकाकर्त्यांनी या

  • Share this:

 

विवेक कुलकर्णी, मुंबई

12 जून : प्रस्तावित मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर होत असलेल्या भूसंपादनाला विरोध करणारी रीट याचिका नाशिकमधल्या शेतकऱ्यांनी मुंबई हायकोर्टात केली आहे. भूसंपादनामुळे शेतकऱ्यांना सुपीक जमिनी गमवाव्या लागतील असं या याचिकेत म्हणण्यात आलं आहे. सध्या उपलब्ध असलेल्या महामार्गांवरच समृद्धी महामार्ग करण्यात यावा असंही या याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटलंय.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शिवडे ग्राम पंचायतीतल्या शेतकऱ्यांनी ही रीट याचिका केली आहे. किरण हरक, भास्कर वाघ, सोमनाथ यांनी ही याचिका दाखल केली आहे. या संदर्भात याचिका दाखल केली असल्यानं राज्य सरकार आणि नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना भूसंपादन करण्यासाठी मनाई करण्याचे आदेश कोर्टाने द्यावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या घोटी सिन्नर मार्गावरुनच समृद्धी महामार्ग नेण्यात यावा असा आदेश हायकोर्टाने द्यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणात आता गावातील ग्रामस्थही कोर्टात आपल्या याचिका दाखल करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2017 07:16 PM IST

ताज्या बातम्या