नाशिककरांसाठी आता दिल्ली दूर नाही, पुन्हा सुरू होणार विमानसेवा

नाशिककरांसाठी आता दिल्ली दूर नाही, पुन्हा सुरू होणार विमानसेवा

देशातल्या छोट्या शहरातील लोकांना विमानसेवेचा वापर करता यावा म्हणून सरकारने उडाण योजनेची घोषणा केली होती.

  • Share this:

नाशिक, 1 जून : देशाच्या राजधानीत जाऊ इच्छिणाऱ्या नाशिककारांना दिलासा मिळाला आहे. कारण नाशिक-दिल्ली विमानसेवा आता पुन्हा होणार सुरू आहे. ही विमानसेवा 15 जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे.

देशातल्या छोट्या शहरातील लोकांना विमानसेवेचा वापर करता यावा म्हणून सरकारने उडाण योजनेची घोषणा केली होती. त्याअंतर्गत नाशिकपासून अनेक ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यात आली होती. पण नाशिक-दिल्ली ही विमानसेवा नंतर काही कारणास्तव बंद झाली होती. पण आता ही विमानसेवा पुन्हा एकदा सुरू झाली असून आठवड्यातून 3 दिवस प्रवाशांना ही सेवा अनुभवता येईल.

जेट एअरवेजनंतर अलायन्स एअरकडून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. सध्या हैदराबाद आणी अहमदाबाद या शहरांना नियमित विमानसेवा सुरू आहे. येत्या काही दिवसात गोवा आणि बंगळुरू ही शहरंही नाशिकला हवाई मार्गांनं जोडली जाणार आहेत.

दरम्यान, उडाण योजनेअंतर्गत देशभरातील अनेक छोटी शहरं  विमानसेवेने जोडली जाणार होती. एअर डेक्कन ही कंपनी कमीत कमी भावात सर्वसामान्यांना विमानाची सेवा घडवणार होती.


VIDEO: धक्कादायक! इडली बनवण्यासाठी शौचालयातील पाण्याचा वापर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2019 10:36 AM IST

ताज्या बातम्या