नाशिक जिल्हा बँक डबघाईला, चेअरमननेच दिला सामूहिक राजीनाम्यांचा इशारा

सध्या या बँकेच्या संचालक मंडळानं बँक वाचवण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडं घातलंय. आता त्यातच बँकेच्या चेअरमनने सामूहिक राजीनामे देण्याची भूमिका घेतल्याने नवा वाद निर्माण झालाय.

Sachin Salve | Updated On: May 11, 2017 08:32 PM IST

नाशिक जिल्हा बँक डबघाईला, चेअरमननेच दिला सामूहिक राजीनाम्यांचा इशारा

11 मे : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचा वाद चांगलाच चव्हाट्यावर आलाय. एकीकडे कर्ज वसुलीसाठी 73 हजार शेतकऱ्यांना बँकेने जप्तीच्या नोटिसा दिल्यात तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडून येणारी कर्जवसुलीही ठप्प झालीय. सध्या या बँकेच्या संचालक मंडळानं बँक वाचवण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडं घातलंय. आता त्यातच बँकेच्या चेअरमनने सामूहिक राजीनामे देण्याची भूमिका घेतल्याने नवा वाद निर्माण झालाय.

शेतकऱ्याची हक्काची बँक म्हणजे जिल्हा बँक....पण नोटबंदीनं या बँकेचे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले ते आजपर्यंत काही सावरले नाही. कर्ज फार दूर राहिलं कारण आपल्याच खात्यात असलेले आपले पैसेही शेतकऱ्यांना काही मिळायला तयार नाही. पैसा नसल्याचं कारण शेतकऱ्यांना सांगितलं जातंय. आता हा तिढा सरकारनं सोडवला नाही तर सामूहिक राजीनामा देणार असा थेट इशाराच चेअरमननं दिलाय.

कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असल्यानं शेतकरी कर्ज भरत नसल्याचं बँकेचे अधिकारी सांगतात. पण याच बँकेत अनेक बडया खातेदारांना पाठीशी संचालक मंडळ पाठीशी घात असल्याचा आरोप शेतकरी संघटना करतंय. संचालक मंडळंच बदमाश असल्याचा आरोप करून त्यांच्याच चौकशीची मागणी स्वाभिमानीनं केलीये.

हे आरोप राजकीय मानले तरी बँकेनं शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती नक्कीच आहे. कारण अनेक शेतकऱ्यांनी आपलं कर्ज भरलं ते खरिपासाठी कर्ज मिळेल या आशेवर. मात्र त्यांनाही कर्ज द्यायला बँक काही तयार नाही.

खरं तर सहकार वाचला तर शेतकरी जगणार पण या सहकारालाच राजकारण्यांनी स्वाहाकार केल्यानं बँक आर्थिक डबघाईला आल्याचं समोर आलंय. आता राज्य बँकेच्या ठेवी मिळाल्या तर काही प्रमाणात दिलासा मिळेल असं चित्र असलं तरी बडया थकबाकीदारांचं काय ? यावर मात्र बँकेचं संचालक मंडळ काही बोलायला तयार नाही. नोटबंदीनंतरच्या बँकेच्या व्यवहाराची चौकशीही सुरू झालीये, निदान यात कोण कोण सापडतात हे आज तरी अनुत्तरीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2017 08:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close