नाशिकमध्ये मनसेची सत्ता गेली, बाॅटेनिकल गार्डनच्या 'लेझर शो'ची बत्ती गेली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बॉटेनिकल गार्डनने सत्ताबदल होताच मान टाकलीये

Sachin Salve | Updated On: May 4, 2017 10:35 PM IST

नाशिकमध्ये मनसेची सत्ता गेली, बाॅटेनिकल गार्डनच्या 'लेझर शो'ची बत्ती गेली

प्रशांत बाग,नाशिक

04 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बॉटेनिकल गार्डनने सत्ताबदल होताच मान टाकलीय. बॉटेनिकल गार्डनमध्ये असलेला लेझर शो गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होतोय. हाय व्हॉल्टेजमुळे इथल्या 'लेझर शो'साठी वापरण्यात येणारे लाइटच उडाल्याने हा शो अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्यात आलाय.

सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रकल्पांचं काय होतं याचं ताजं उदाहरण म्हणजे बॉटनिकल गार्डनं...मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत मेहनतीने वनविभागाशी वाटाघाटी करुन शहरात हा प्रकल्प उभा केला. शहराच्या सौंदर्यात या प्रकल्पाने भर तर घातलीच मात्र नाशिककरांना मनोरंजनासाठी एक हक्काचं ठिकाण देखिल मिळालं. पर्यावरणाचा संदेश देणारा हा लेझर शो अनुभवण्यासाठी नाशिककरांची चांगलीच गर्दी होत होती. सत्तापरिवर्तन झाल्यानंतर मात्र बॉटनिकल गार्डनची जणु रयाचं गेलीय. या उद्यानंचं प्रमुख आकर्षण असलेला लेझर शो अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आलाय.

अत्यंत उच्च दर्जाचं तंत्रज्ञान वापरण्यात आल्यानं आशियातील सर्वात महागडा आणि आकर्षक लेझर शो म्हणून याचा नावलौकिक होता. मात्र विजवितरण विभागाच्या अनिश्चित वीजपुरवठ्यामुळे या लेझर शो साठी वापरण्यात येणारे सुमारे १५०-२०० महागडे लाईट जळालेत. या लाइटच्या रिपेअरिंगचं काम सुरू असलं तरी याचा खर्च आणि याचं तंत्रज्ञान महाग असल्यानं हा शो अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आलाय.

मनसेच्या सत्ताकाळात शहराच्या सौंदरीकरणावर राज ठाकरे यांनी भर दिला होता. ठाकरे यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या यशस्वी वाटाघाटींमुळे बॉटनिकल गार्डनसारखे प्रकल्प शहरात उभं राहिलं. मात्र सत्तांतर होताच जणू या कामांशी आपला संबंध नसल्याच्या आविर्भावात पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केलीय. शहराच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी अशापद्धतीचं राजकारण मारक असल्याची भावना सध्या नाशिकमधून व्यक्त होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 4, 2017 09:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close