13 जुलै : नाशिकमध्ये बाळू खरे या पोलीस हवालदारावर प्राणघातक हल्ला झाला आहे. अज्ञात इसमाने मागून येऊन तीक्ष्ण हत्याराने हा वार केला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.
बाळू खरे हे भद्रकाली पोलीस ठाण्याचे हवालदार आहेत. या हल्ल्याची घटना पोलीस स्टेशन बाहेरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पण घटनेबाबत अजुनतरी गुन्हा दाखल झाला नाहीये. पण गुन्हा दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा