Elec-widget

महाराष्ट्र दिनी नाशिकची विमानसेवा पुन्हा सुरू होणार!

महाराष्ट्र दिनी नाशिकची विमानसेवा पुन्हा सुरू होणार!

डिसेंबरमध्ये सुरू झाली होती. पण मध्यंतरी काही कारणास्तव ही विमानसेवा बंद पडली होती. याबाबतीत एअर डेक्कननेही हात वर केले होते. पण आता ही विमानसेवा दोन महिन्यांनी पुन्हा सुरू होणार आहे.

  • Share this:

नाशिक ,30 एप्रिल:   1 मे पासून नाशिकची  विमानसेवा  पुन्हा सुरू होणार आहे.    मुंबई आणि पुण्यासाठी  नाशिकहून विमानं   टेकऑफ करणार आहेत.

देशातल्या छोट्या शहरातील लोकांना विमानसेवेचा वापर करता यावा म्हणून सरकारने उडाण योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत देशभरातील अनेक छोटी शहरं  विमानसेवेने जोडली जाणार होती. एअर डेक्कन ही कंपनी कमीत कमी भावात सर्वसामान्यांना विमानाची सेवा घडवणार होती. त्याअंतर्गत  नाशिक मुंबई विमानसेवा  डिसेंबरमध्ये सुरू झाली होती. पण मध्यंतरी काही कारणास्तव ही विमानसेवा बंद पडली होती. याबाबतीत एअर डेक्कननेही हात वर केले होते. पण आता ही विमानसेवा दोन महिन्यांनी पुन्हा सुरू होणार आहे.

एअर डेक्कननं फ्लाईट्ससाठी   ऑनलाइन बुकिंगही सुरू केलं  आहे.   सकाळी 6 ला मुंबईसाठी होणार आहे.  1349 रुपयांचा सुधारित तिकीट दर ठरवण्यात आला आहे.   उडान योजनेअंतर्गत पहिल्या 9 तिकीटांना ही सवलत लागू होणार आहे.

आता ही विमानसेवा सुरळीत सुरू राहते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान एअर डेक्कनचं जाळं देशात आणखी वाढवण्याचा सरकारचा विचार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2018 10:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...