नाशिकमध्ये गॅस्ट्रोच्या थैमानाने 4 जणांचा बळी, 150 जण रुग्णालयात

सुरगाण्यातील राहुडेतमध्ये आतापर्यंत 3 जणांचा बळी घेतला आहे. तर कळवण तालुक्यातदेखील एका महिलेचा बळी गेला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2018 02:46 PM IST

नाशिकमध्ये गॅस्ट्रोच्या थैमानाने 4 जणांचा बळी, 150 जण रुग्णालयात

नाशिक, 12 जुलै : गॅस्ट्रोच्या आजाराने नाशिक जिल्ह्यात थैमान घातलं आहे.  सुरगाण्यातील राहुडेतमध्ये आतापर्यंत 3 जणांचा बळी घेतला आहे. तर कळवण तालुक्यातदेखील एका महिलेचा बळी गेला आहे. या घटनेनतंर जिल्हाधिकारी यांनी आरोग्य यंत्रणेला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी राहुडेत या गावात पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत शेजारून जाणाऱ्या नाल्याचे पाणी मिसळलं होत. त्यामुळे 150 जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या गावाची 850 लोकसंख्या असून येथील काही नागरिकांना जुलाब उलट्या होऊ लागल्या आहेत. त्यामुळे प्रथम या रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

पावसाळ्यात कुठला आहार घ्याल?

आतापर्यंत यात या गावातील नामदेव गांगुर्डे, सीताराम पिठे, बशीरा लिलके या 3 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच गावातील परिस्थिती गंभीर झाल्याने आरोग्य पथकाकडून घराघरात जाऊन प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात आहे. मात्र आता गॅस्ट्रोच्या आजाराला आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेला जास्त काम करावं लागणार आहे.

हेही वाचा...

Loading...

वांद्र्याच्या सरकारी वसाहतीचा स्लॅब कोसळला, आई आणि मुलगा गंभीर जखमी

आंतरराष्ट्रीय मॉडलिंगमध्ये सगळ्यात प्रसिद्ध भारतातील आदिवासी मुलगी, दिसते रिहानासारखी

अनुराग कश्यपसाठी 'या' अभिनेत्रीनं केला न्यूड सीन!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2018 02:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...