नाशिकमध्ये 14 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू, आईची भूमिका संशयास्पद

जखमी अवस्थेत चिमुकलीला दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2019 08:19 PM IST

नाशिकमध्ये 14 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू, आईची भूमिका संशयास्पद

प्रशांत बाग नाशिक 16 जुलै : नाशिक शहरात एका 14 महिन्यांच्या मुलीच्या मृत्यूने मंगळवारी (16 जुलै) खळबळ उडालीय. हा मृत्यू नाही तर घातपात असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील औरंगाबाद महामार्गावरील पॅराडाईज नावाच्या अपार्टमेंटमधील मुकेश पवार कुटुंबीयांची ही मुलगी होती. हा मृत्यू नाही तर घातपात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. बालिकेला जखमी अवस्थेत तिच्या कुटुंबीयांनी पंचवटीतील निमाणी परिसरातील येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मुलीचा मृत्यू झाल्याचं घोषित केल्याचं पोलिसांनी सांगितले. घरात असलेली मुलीची आईसुद्धा जखमी असल्याची माहिती आहे. मुलीचे वडील कामावर गेले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आई परस्परविरोधी माहिती देत असल्याने संशय बळावला असून आईच्या हातावरच्या खुना या किरकोळ असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे नेमकं काय झालं याचा पोलीस तपास करत आहेत.

(वाचा : अजिंठा लेणी परिसरात दारु आणि हुक्का पार्ट्या, नशेखोरांचा हैदोस)

याबाब पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, पॅराडाईज सोसायटीमधील एका सदनिकेत पवार कुटुंब वास्तव्यास आहे. हा परिसर आडगाव पोलीस ठाणे हद्दीत येतो. स्वरा मुकेश पवार या जेमतेम 14 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. जखमी अवस्थेत चिमुकलीला दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

(वाचा : 'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स)

बालिकेच्या आईवडिलांनी याबाबत कुठलीही माहिती अद्याप पोलिसांना दिलेली नाही. बालिकेच्या गळ्यावर जखमा असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. बालिकेचा मृत्यू झाला असून तिच्या मानेभोवती जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे नेमकं काय झालं याची चर्चा सुरू झाली. सर्व शक्यता गृहित धरून तपास करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Loading...

(वाचा :नागपूरमधील तरुणीच्या हत्येला तापसीने 'कबीर सिंग'ला धरलं )

VIDEO : मुलांना मांडीवर घेऊन वाचवलं अन् तिने मृत्यूला कवटाळलं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 07:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...