नाशिकमध्ये महिन्याभरात स्वाईन फ्ल्यूचे 14 बळी

पालिकेतील कर्मचारी सुनील पवार यांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झालाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2017 09:28 PM IST

नाशिकमध्ये महिन्याभरात स्वाईन फ्ल्यूचे 14 बळी

02 सप्टेंबर : अवघ्या एका महिन्यात नाशिक शहरात स्वाईन फ्ल्यूचा 14 वा बळी गेल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पालिकेचा आरोग्य विभाग नेहमीच करतो, आता याच पालिकेतील कर्मचारी सुनील पवार यांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झालाय.

हवामानात झालेला बदल, वाढलेला दमटपणा, दूषित पाण्यामुळे होत असलेला साथीच्या रोगांचा प्रसार याने रुग्ण बेजार झाले आहे. किरकोळ वाटणारा आजार हे रुग्ण अंगावर काढतात आणी तोच आजार पुढे धोकादायक ठरतोय.

या वर्षभरात नाशिक शहरात सगळ्यात जास्त 14 रुग्ण आतापर्यंत दगावले आहे तर तब्बल 62 हजार 762 रुग्णांची तपासणी झाली आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात 4 रुग्ण दगावले होते यंदा हा आकडा अवघ्या 8 महिन्यात 57 झालाय.

ऐन गणेशोत्सवाच्या काळात स्वाईन फ्ल्यूने धुमाकूळ घातलाय. पालिकेकडून फक्त कागदोपत्री जनजागृती केली जात असून संशयित रुग्ण दाखल झाला की लागण बाहेरून आणल्याचा अजब खुलासा करीत जबाबदारी पालिकेचा आरोग्य विभाग करतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2017 09:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...