S M L

साहेबांना काय त्रास दिला हे उघडकीला आणेन, राणेंची उद्धव ठाकरेंना धमकी

"मी बाळासाहेबांना कधीच त्रास दिला नाही, उलट उद्धव ठाकरे यांनीच बाळासाहेबांना त्रास दिला होता"

Sachin Salve | Updated On: Dec 9, 2017 07:25 PM IST

साहेबांना काय त्रास दिला हे उघडकीला आणेन, राणेंची उद्धव ठाकरेंना धमकी

09 डिसेंबर : मी बाळासाहेबांना कधीच त्रास दिला नाही, उलट उद्धव ठाकरे यांनीच बाळासाहेबांना त्रास दिला होता अशी जोरदार टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केलीय. जर त्यांनी तोंड बंद केलं नाही, तर उद्धवने घरात बाळासाहेबांना काय त्रास दिला हे मी भविष्यात उघडकीस आणणार अशी धमकीच राणेंनी दिलीये.

नारायण राणे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. सांगली इथं प्रसार माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केलीय. उद्धव ठाकरे यांनी त्यांनी माझ्यावर टीका टिप्पणी करण्याऐवजी विकास आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याच काम करावे. उद्धवला राजकारणाचा गंध नाही. केंव्हा काय बोलावे हे कळत नाही. अठरा मिनिटांच्यावर याचे भाषण जातच नाही, १६ मिनिटं टीका करणे आणि ३ मिनिट गोंजारणे इतकंच त्यांना जमते', असा टोला राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.

माझा विश्वासघात कोण करेल असे वाटत नाही. मला जो विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला आहे तो विश्वास मुख्यमंत्री पूर्ण करतील. मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात आणि देशात काँग्रेस पक्षाची दशा दिशाहीन झाली आहे. सध्या गुजरात निवडणुकीत चुरस दिसत असली तरी तिथे भाजपच विजयी होईल, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 9, 2017 07:25 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close