साताऱ्यातून भाजपचा हा नेता देणार उदयनराजेंना टक्कर

राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 21, 2019 01:37 PM IST

साताऱ्यातून भाजपचा हा नेता देणार उदयनराजेंना टक्कर

सातारा, 21 फेब्रुवारी : युतीच्या घोषणेनंतर आता सातारा लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा करणार असल्याची माहिती आहे. भाजपकडून माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.  

या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथं उदयनराजे विरुद्ध नरेंद्र पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

2014 ला सेनेकडून RPI आठवले गटाला सातारा लोकसभा मतदारसंघ सोडला होता. पण आता RPI भाजपच्या गोटात आहे. आणि भाजपने अद्यापपर्यंत आरपीआयला एकही जागा सोडलेली नाही. त्यामुळे या मतदारसंघावर आता भाजप स्वत:चाच उमेदवार देण्याची शक्यता आहे.

भाजपकडून या मतदारसंघासाठी चर्चेत असणारे नरेंद्र पाटील हे सध्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर अध्यक्ष आहेत. ते जर उदयनराजेंविरोधात उभे राहिले तर या मतदारसंघात चांगली लढत होईल, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

सातारा आणि उदयनराजे

Loading...

राज्यभरातील लोकसभा मतदासंघात साताऱ्याची जागा सर्वात जास्त चर्चेत आहे. कारण या जागेवर विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रम आहे.

सातारा आणि कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असावा, याबाबत निर्णय झाला आहे, अशी माहिती शरद पवारांनी दिली होती. पण नक्की कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे, हे मात्र पवारांनी सांगितलं नाही. असं असलं तरीही राष्ट्रवादीकडून आता उदयनराजेंचं नाव निश्चित मानलं जात आहे.


एकट्या महिलेने लिफ्टमध्ये जाण्याआधी हा व्हिडिओ नक्की पाहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 01:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...