Elec-widget

दिल्लीत अमोल कोल्हेंच्या नावाची चर्चा, पहिल्या भाषणावर मोदी म्हणाले...

दिल्लीत अमोल कोल्हेंच्या नावाची चर्चा, पहिल्या भाषणावर मोदी म्हणाले...

अमोल कोल्हे यांनी संसदेत शेती, बैलगाडा शर्यत, गडकिल्ले अशा अनेक विषयांबाबत भाष्य करत सरकारचं लक्ष्य वेधून घेतलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 जून : नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत केलेल्या भाषणाची (amol kolhe speech) सध्या जोरदार चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमोल कोल्हे यांच्या भाषणाचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.

शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून गेलेल्या अमोल कोल्हे यांनी संसदेत शेती, बैलगाडा शर्यत, गडकिल्ले अशा अनेक विषयांबाबत भाष्य करत सरकारचं लक्ष्य वेधून घेतलं. यावेळी त्यांनी केलेली विषयांची मांडणी आणि वक्तृत्वशैली यामुळे कोल्हे यांचं कौतुक झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभ्यासपूर्ण भाषण केल्याबद्दल काही मोजक्या खासदारांचा उल्लेख केला. त्यात अमोल कोल्हे यांच्या नवाचाही समावेश होता.

दरम्यान, शिरूरमध्ये यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचा हा अभेद्द समजला जाणारा बालेकिल्ला सर केला. डॉ. अमोल कोल्हे हे 58483 मतांनी विजयी झाले. शिवसेनेला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. कारण शिवसेनेनं आता पक्षाच्या शिस्तभंग केल्याचा आरोप करत अनेक पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे.

जुन्नरमधील शिवसेनेच्या नेत्या आणि जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांची पक्षानं हकालपट्टी केली आहे. लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांना मदत न केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. आशा बुचके यांच्यासह इतरही काही पदाधिकाऱ्यांना शिवसेनेनं घरचा रस्ता दाखवला आहे.

दरम्यान, या निवडणुकीत शिवसेनेची मदार विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरच होती. शिवाजीराव आढळराव याआधी 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली. त्यामुळे या दोघांमध्ये थेट लढत झाली. राष्ट्रवादीचं संघटन आणि स्वत:ची प्रतिमा यासोबत अमोल कोल्हे जिंकून येण्यामागे इतरही अनेक कारणं आहेत.

Loading...

अमोल कोल्हेंच्या विजयामागील सर्वात मोठं कारण ठरलं ते प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं एक वक्तव्य. अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर एका प्रश्नाला उत्तर देताना आढळराव पाटील यांनी थेट अमोल कोल्हेंच्या जातीचा उल्लेख केला.

'तुमच्याविरोधात एका तगडा मराठा उमेदवार देण्यात आलाय, त्यावर तुमचं मत काय?' असा प्रश्न आढळराव यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना आढळराव यांनी थेट अमोल कोल्हेंच्या जातीचा उल्लेख करत ते माळी समाजाचे असल्याचं सांगितलं. त्यामुळे निवडणुकीत फायदा उठवण्यासाठी आढळरावांनी जातीचं राजकारण केल्याची चर्चा सुरू झाली. याचाच आढळराव यांना मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात मराठा समाजापाठोपाठ माळी समाजाचीही लक्षणीय संख्या आहे. अमोल कोल्हे यांनी मालिकेतून छत्रपती शिवरायांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली असल्याने मराठा समाजासह सर्वच समाजात त्यांची चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे आढळराव यांना अमोल कोल्हे यांच्या जातीचा उल्लेख करणं महागात पडल्याचं निकालातून दिसून आलं आहे.

VIDEO: अख्खी एक्स्प्रेस ट्रेन अंगावरून गेली मात्र त्याला खरचटलं सुद्धा नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 09:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...