युतीवर सस्पेंस कायम, काहीच नाही बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी

युतीवर सस्पेंस कायम, काहीच नाही बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आगामी निवडणुकांच्या तोंडावर सध्या चर्चा आहे ती भाजप-शिवसेनेच्या युतीची.

  • Share this:

सोलापूर, 09 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आगामी निवडणुकांच्या तोंडावर सध्या चर्चा आहे ती भाजप-शिवसेनेच्या युतीची. पण आजच्या या भाषणात नरेंद्र मोदी यांनी युतीसंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.

मोदींच्या या दौऱ्यावेळी युतीच्या चर्चेविषयी मोदींना माहिती दिली जाणार, तसंच भाजपच्या लोकसभा तयारीचीही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली होती. पण त्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला नाही. त्यामुळे भाजप-शिवसेनेच्या युतीवरून सामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना नेत स्वबळाचा नारा देताना दिसत आहेत. 'युती होईल असं वाटत नसल्याचं' मतही शिवसेनेच्या संजय राऊत यांनी व्यक्त केलं होतं. तर स्वबळाचा नारा देऊ असा ईशाराही अमित शहा यांच्याकडून देण्यात आला होता. पण याबद्दल अद्याप कोणत्याही पक्षाने स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.


डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेत उद्धव ठाकरेंनी मोदींवर केला मोठा हल्ला


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्तांना धान्य वाटप केलं आहे. दरम्यान, मी इथं राजकारण करायला आलेलो नाही. कोरड्या भाषणांनी काही होणार नाही. त्यासाठी आता सरकारला जाब विचारावा लागणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.


'सरकारने तळं दिलं पण पाणी कोण देणार' असं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. 'नरेंद्र मोदी सध्या सोलापूर दौऱ्यावर आहे. सरकारची ताकद मोठी आहे. त्यांचा नेहमी परदेशी दौरा सुरू असतो. ट्रम्पसोबत फोटो काढता तसं माझ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबतही फोटो काढा' अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केली आहे.


"इथून पुढे काहीही झालं तरी शेतकऱ्यांनी आत्महत्या करायचा विचारसुद्धा मनात आणायचा नाही. त्यांच्यासाठी शिवसेना कायम सज्ज आहे " असं आवाहन उद्धव यांनी मराठवाड्यातील दुष्काळी भागात केलं आहे.


LIVE : 'या चौकीदारानं देशाची राखणदारी केली आहे', मोदींची राहुल गांधींवर टीका


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे- विठ्ठल रुक्मिणीला मोदींचं नमन


- या चौकीदारानं राखणदारी केलेली आहे


- आम्ही गाजावाज न करता गरीबांच्या खात्यात तीन हजार कोटी रुपये पोहोचवलेत


- पूर्वी दलाल हे सगळा पैसा खात असत आ़ज ही सगळी दलाली बंद झालेली आहे


- 2004 ते 2014 दिल्लीत रिमोट कंट्रोलवर चालणारं सरकार होतं - मोदींचा कॉंग्रेसवर हल्ला


- केवळ भूमीपूजन करायचे आणि मागे वळूनही पहायचे नाही ही आमची संस्कृती नाही


- भूमीपूजन आम्ही केलंय घरांच्या चाव्या देण्यासाठीही आम्हीच येणार


- देशाच्या पूर्व भागातला विकास खुंटला तो यापूर्वीच्या राज्यकर्त्यांमुळे


- आपली शहर आर्थिक उलाढालींचीं केंद्र


- आमच्या सरकारनं समस्यावंर शाश्वत उपाय शोधले


- प्रत्येक घरात वीज पोहचवण्याचं काम केल्याबद्दल फडणवीस सरकारचे कौतुक


- सरकारने १ हजार कोटींच्या सोलापूर तुळजापूर रेल्वेला मंजुरी दिली


- देशाला शुभेच्छा...सर्वांना १० टक्के आरक्षणाला मंजुरी मिळाली आहे.


-  पण काही लोक जनतेची दिशाभूल करत आहेत. आरक्षणाला काहींनी विरोध केला तरीही मंजूर केला. आज राज्यसभेत मांडला जाणार आहे.


- दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही.


- सबका साथ सबका विकास ही आमची संस्कृती


- मतांच्या राजकारणासाठी जातीचं राजकारण


- राज्यसभेतही आज हे विधेयक मंजूर होईल हा विश्वास


- अतिरिक्त 10 टक्के आरक्षण देऊन सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न


- भाजप जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटीबद्ध


- आम्ही दिखाव्यासाठी काम करत नाही


- लाखो कुटुंबांना आरक्षणाचा लाभ


- काही लोकांना राजकारणाशिवाय बाकी काही सुचत नाही


- या लोकांकडून स्मार्ट सिटी प्रकल्पाची खिल्ली उडवली गेली


- आमचं सरकार एका नवीन विचारासह काम करत आहे


- आम्ही एकट्या सोलापुरात तीस हजार घरं बांधली


- आम्ही केवळ गरीबांचाच नाही तर मध्यमवर्गाचाही विचार करतो


Special Report : कोमात गेलेलं बाळ 40 दिवसांनंतर शुद्धीवर, डॉक्टरांनाही अश्रू अनावर


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2019 01:06 PM IST

ताज्या बातम्या