S M L

मारेकरी सापडले, सूत्रधाराचा शोध कधी लागणार?

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज 5 वर्षं पूर्ण झाली. दोन दिवस आधीच दाभोलकरांचे मारेकरी सापडल्याने हा दिवस पुरोगामी कार्यकर्त्यांसाठी समाधानाचा दिवस आहे.

Updated On: Aug 20, 2018 08:50 AM IST

मारेकरी सापडले, सूत्रधाराचा शोध कधी लागणार?

पुणे,ता.20 ऑगस्ट : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज 5 वर्षं पूर्ण झाली. दोन दिवस आधीच दाभोलकरांचे मारेकरी सापडल्याने हा दिवस पुरोगामी कार्यकर्त्यांसाठी समाधानाचा दिवस आहे. कारण मारेकऱ्यांचा शोध लावा या मागणीसाठी हे कार्यकर्ते गेली पाच वर्ष पुण्यातल्या ओकांरेश्वर पुलावर निषेध जागर सभेचं आयोजन करत होते. आजही असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात यात डॉ. बाबा आढाव, मेधा पानसरे, तुषार गांधी, कविता लंकेश, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, श्रीविजय कलबुर्गी यांच्यासह अनेक मान्यवर मोर्चात सहभागी झाले आहेत. मारेकरी सापडले आता सूत्रधाराचा शोध लावा अशी मागणी या मान्यवरांनी केली.

असा लागला मारेकऱ्यांचा तपास

दाभोलकांच्या मारेकऱ्यांचा तपास कधीच लागणार नाही का? असा सवाल उभ्या महाराष्ट्राला पडला होता. न्यायालयानं देखील याच मुद्द्यावरून तपासयंत्रणांना वारंवार फटकारलं होतं. मात्र अचानक तपासाची अशी चक्र फिरली आणि तपासयंत्रणा मारेकऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचले.



या प्रकरणाच्या धिम्या तपासासाठी टीकेचे धनी ठरलेल्या तपास यंत्रणांना अखेर पाच वर्षांनंतर दाभोलकरांच्या मारेकऱ्यांच्या छडा लावण्यात यश आलंय. नालासोपारा स्फोटकं प्रकरणातील आरोपी शरद कळस्करनं दिलेल्या जबाबावरून सीबीआयनं सचिन अंदुरेला औरंगाबादमधून अटक केली. याच सचिन अंदुरेनं दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा आरोप सीबीआयनं केलाय. सचिन अंदुरेच्या अटकेसाठी टर्निंग पॉईन्ट ठरला तो म्हणजे एटीएसने नालासोपाऱ्यात स्फोटकांसह अटक केलेल्या वैभव राऊतचा जबाब.

वैभव राऊतसह अटक करण्यात आलेल्या शरद कळसकरनं डॉ. दाभोलकरांची रेकी केली होती. याच रेकीतून २० ऑगस्टच्या सकाळी कळसकर आणि सचिन अंदुरे दोघेही ओंकारेश्वर पुलाजवळ चालत गेले आणि अंदुरेने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या. दाभोळकर कोसळल्याची खात्री केली आणि जवळच चावी लावून ठेवलेल्या बाईकवरुन दोघंही पसार झाले, अशी माहिती आता एटीएसच्या चौकशीतून पुढे आली आहे.

सचिन अंदुरेच्या नातेवाईकांनी मात्र सर्व आरोप फेटाळले असून, तपास यंत्रणा त्यांचं अपयश झाकण्यासाठी अंदुरेला बळीचा बकरा बनवत असल्याचं सांगत आहेत. डॉ. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने सनातनचा पनवेल आश्रमातला साधक वीरेंद्र तावडे याला आधीच अटक केली आहे. याच तावडेची मोटरसायकल आरोपींनी वापरली होती का याचा तपास आता एटीएस आणि सीबीआय आता करत आहेत.

Loading...
Loading...

गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांची हत्या एकाच रिव्हॉलवरने केली आहे का? की एकाच साच्यातून बनवलेल्या ४ वेगवेगळ्या रिव्हॉलवरने चौघांच्या हत्या करण्यात आल्या आहेत? या दृष्टीकोनातून आता सीबीआयने तपास सुरु केलाय. वैभव राऊतच्या नालासोपारा येथील घर आणि दुकानातून मिळालेले १० पिस्तूल बॅरल, ६ अर्धवट तयार केलेल्या पिस्तूल, ३ अर्धवट मॅग्झीन, ७ अर्धवट पिस्तुल स्लाईड, १६ रिले तसंच सुधन्वा गोंधळेकर याच्या पुण्यातील घरातून मिळालेली स्फोटकं आणि बंदूक बनवण्याची माहिती देणारं पुस्तकं हे सर्व साहित्य फॉरेन्सीक प्रयोग शाळेत पाठवण्यात आली आहेत. आता, अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या म्होरक्याचा शोध घेण्याचं आव्हान एटीएस आणि तपासयंत्रणेसमोर असणार आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2018 08:50 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close