S M L

अमोल काळेच्या डायरीत धक्कादायक माहिती, 'या' चार जणांना मारण्याचा होता कट

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला आरोपी अमोल काळेचा ताबा सीबीआयनं घेतला आहे.

Updated On: Sep 6, 2018 09:34 AM IST

अमोल काळेच्या डायरीत धक्कादायक माहिती, 'या' चार जणांना मारण्याचा होता कट

बंगळुरू, 06 सप्टेंबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला आरोपी अमोल काळेचा ताबा सीबीआयनं घेतला आहे. बंगळुरूमधून त्याला पुण्यात आणलं जातंय आणि दुपारी अमोल काळेला पुणे कोर्टात हजर करण्यात येईल. या सगळ्यात त्याच्या डायरीमधून कर्नाटक एसआयटीला धक्कादायक माहिती मिळाली आहे. आणखी 4 जणांचा हत्येचा कट रचला जात होता आणि या चार जणांची नावं काळेच्या डायरीत सापडली आहेत. गिरीश कर्नाड, के. एस. भगवान, नरेंद्र नायक आणि चमकल स्वामी यांची नावं या डायरीत होती. 'एक ही दिन 4 अधर्मीयों का विनाश' असा उल्लेख या डायरीत करण्यात आला आहे.

दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या कशासाठी आणि कुणाच्या सांगण्यावरून केली याचं गूढ अजून पूर्णपणे उलगडलेलं नाहीये. पण शरद कळसकरच्या चौकशीतून सीबीआयला महत्त्वाची माहिती मिळालीय. त्यातून दाभोलकरांवर गोळ्या झाडल्यानंतर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर पळून कसे गेले, याचा उलगडा झालाय. अतिशय चलाखीनं त्यांनी सीसीटीव्ही नसलेला रस्ता शोधून काढला होता.

असा होता घटनाक्रम...

- गोळ्या झाडल्यानंतर सचिन अंदुरे आणि शरद कळसकरनं ओंकारेश्वर मंदिराच्या मागून नदीपात्राच्या रस्त्यानं दुचाकीवर पळून जायला सुरुवात केली.

- नदीपात्रातल्या रस्त्यानं डेक्कनच्या मागच्या बाजूने थेट कर्वेनगरचा रस्ता पकडला.

- सकाळच्या सुमारास अत्यंत शांत असलेल्या या रस्त्याने त्यांनी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा परिसर गाठला.

- तिथेच त्यांनी त्यांच्याजवळ असलेली दोन्ही पिस्तुलं आणि गाडी त्यांना सांगण्यात आलेल्या व्यक्तीच्या ताब्यात दिली.

- या व्यक्तीची ओळख देण्यात दोन्ही आरोपींनी अजूनपर्यंत तरी असमर्थता दर्शवलीये.

- कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाहेर गाडी आणि पिस्तुल दिल्यानंतर तिथूनच त्यांना एका कारमध्ये बसायला सांगण्यात आलं.

- या कारनं दोघांनाही शिवाजीनगर बस स्थानकात आणून सोडलं.

- शिवाजीनगरहून या दोन्ही आरोपींनी औरंगाबादची एसटी बस पकडली.

हत्येनंतर औरंगाबादला पळून गेल्याची माहिती कळसकरनं सीबीआयला दिलीय. कळसकरनं दिलेल्या माहितीची सीबीआय उलटतपासणी करतेय. पण पाच वर्षांचा कालावधी उलटल्यानं या माहितीची खातरजमा करण्याचं मोठं आव्हान साबीआयपुढे आहे.

 

राम कदम यांच्यावर 'ट्रोल धाड' : सोशल मीडियावर 'बेटी भगाओ' व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 6, 2018 09:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close