अहमदाबादमध्ये एकाच गाडीत राणे आणि मुख्यमंत्री

अहमदाबादमध्ये एकाच गाडीत राणे आणि मुख्यमंत्री

अहमदाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे एकाच गाडीत असल्याचं समोर आलंय

  • Share this:

13 एप्रिल : काँग्रेसनचे नेते नारायण राणे आता भाजपच्या उंबरठ्यावर उभं असल्याचं स्पष्ट झालंय. अहमदाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे एकाच गाडीत असल्याचं समोर आलंय. मुख्यमंत्रीच राणेंना शहांकडे घेऊन गेले का? असा सवाल उपस्थितीत झालाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बुधवारी अमित शहांची अहमदाबादमध्ये भेट घेतली. दोघांमध्ये दोन तास राणेंबद्दलच चर्चा झाली. विशेष म्हणजे स्वतः नारायण राणेंही अहमदाबादमध्ये होते. मात्र शहा आणि राणेंची भेट झाली नसल्याचं स्पष्टीकरण खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलंय. पण आता राणे आणि मुख्यमंत्री एकाच कारमधून प्रवास करत असल्याचं समोर आलंय. मुख्यमंत्री फडणवीस यांनीच राणे यांना शहांची भेट घेण्यासाठी घेऊन गेले का ? अशी चर्चा रंगलीये.

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही नारायण राणे भाजपमध्ये आले तर चांगलं आहे अशी प्रतिक्रिया देऊन राणेंच्या भाजप प्रवेशाला दुजोरा दिलाय.

परंतु, राणे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच गाडीत प्रवास केला तर त्यात गैर काही नाही. त्यामुळे भाजपमध्ये ते आले असा याचा अर्थ नाही. जर ते भाजपमध्ये येण्याचा विचार करत असतील तर राणे आता योग्य विचार करत आहेत असं वाटतंय असं विधानही मुनगंटीवार यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2017 12:53 PM IST

ताज्या बातम्या