मुख्यमंत्री-शहांची अहमदाबादमध्ये भेट; राणेंच्या पक्ष प्रवेशाबद्दल चर्चा?

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2017 09:12 AM IST

मुख्यमंत्री-शहांची अहमदाबादमध्ये भेट; राणेंच्या पक्ष प्रवेशाबद्दल चर्चा?

13 एप्रिल : नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल हालचालींना वेग आला आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अहमदाबादमध्ये भेट झाली असून दोघांमध्ये एक तासभर राणेंबद्दलच चर्चा झाल्याचं समजतंय. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेदेखील त्यावेळी अहमदाबादमध्ये उपस्थित होते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे पक्षांतर्गत कुरघोडींमुळे नाराज असून पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच आता हे तिन्ही नेते एकाच वेळी अहमदाबादमध्ये असल्याने चर्चांना आणखीनच उधाण आलं आहे.

नारायण राणे आणि मुख्यमंत्री किंवा अमित शाह यांच्या भेटीविषयी नेमकी माहिती समोर आलेली नाही. मात्र नारायण राणे यांनी मीडियाशी कोणतीही चर्चा न करता अहमदाबादमधून रवाना झाले आहेत.

नारायण राणे दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांमुळे अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट महत्वाची मानली जात आहे. या बैठकीत हाच विषय चर्चेत होता का याविषयी तर्क वितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी नारायण राणे यांनी आपण काँग्रेस पक्ष सोडत असल्याची अफवा असल्याचं सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांना भेटलो याचा अर्थ पक्षांतर करतो असा होत नाही. काँग्रेसमधल्याच काही लोकांनी माझ्या पक्षांतराची बातमी पसरवल्याचा आरोप करत, मी पक्षांतर करतोय ही निव्वळ अफवा असल्याच राणेंनी स्पष्ट केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2017 09:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...