...राणेंचा मुलगा कसा शोभला असता?-नारायण राणे

...राणेंचा मुलगा कसा शोभला असता?-नारायण राणे

दुसरं काही फेकायला मिळालं नाही म्हणून नितेशने मासा फेकला. पण तो अधिकाऱ्यांवरती नाही असं सांगत राणेंनी नितेश राणेंच्या कृतीचं समर्थन केलंय.

  • Share this:

सिंधुदुर्ग, 08 जुलै : 6 जुलैला आमदार नितेश राणे यांनी मालवणात केलेल्या मच्छिमारांच्या आंदोलनात मत्स्य आयुक्तांना मासा फेकून मारला होता आणि अर्वाच्च शब्दात दादागिरी केली होती. या दादागिरीचं समर्थन नारायण राणेंनी केलं आहे.

दुसरं काही फेकायला मिळालं नाही म्हणून नितेशने मासा फेकला. पण तो अधिकाऱ्यांवरती नाही असं सांगत राणेंनी नितेश राणेंच्या कृतीचं समर्थन केलंय. नाहीतर नितेश राणेंचा पुत्र कसा शोभला असता असंही राणे म्हणाले आहेत.

सिंधुदुर्गमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना फक्त ढोलच वाजवते. शिवसेनेची वैचारिक पातळी नाही. अशीही टीका त्यांनी केली. यावेळी राणेंनी जीएसटीवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, जीएसटीमुळे गरिबी कशी दूर होईल ?  जीएसटीमुळे हॉटेल्स बंद पडायची वेळ आली . ज्या राज्यात टॅक्स जास्त त्या राज्यात गुंतवणूक कशी येणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2017 06:44 PM IST

ताज्या बातम्या