S M L

केसरकरांविरोधात नारायण राणे ठोकणार 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा !

"माझ्या कुटुंबियांविरोधात हायकोर्टात कोणत्याही केसेस चालू नसून, केसेस चालू असल्याचा खोटा दावा केसरकर करत आहे."

Sachin Salve | Updated On: Nov 18, 2017 06:09 PM IST

केसरकरांविरोधात नारायण राणे ठोकणार 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा !

18 नोव्हेंबर : सिंधुदुर्गात महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची घोषणा केलीये.

सिंधुदुर्गात नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. अलीकडे नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वत: चा पक्ष स्थापन केला. पक्ष स्थापन केल्यानंतर राणेंनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राणेंच्या भाजपप्रवेशामुळे दीपक केसरकर यांनी राणेंवर सडकून टीका केली होती. 'तुम्ही ज्यांना घेताय. त्यांच्यावर किती केसेस आहेत. मुलांवर किती केसेस आहेत. कुठल्या चौकशा सुरू आहेत हे जरा तपासावे, पारदर्शी कारभाराचा आग्रह धरणारे ते पाळतील अशी आशा करूया अशी टीका केसरकरांनी केली होती.

केसरकरांच्या या टीकेचा समाचार घेत राणे आता थेट 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे.माझ्या कुटुंबियांविरोधात हायकोर्टात कोणत्याही केसेस चालू नसून, केसेस चालू असल्याचा खोटा दावा केसरकर करत आहे. केसरकरांच्या दाव्यामुळे माझी आणि माझ्या कुटुंबियांची बदनामी झाली असल्यामुळे सोमवारी हायकोर्टात केसरकरांविरोधात याचिका दाखल करणार अशी माहिती राणेंनी दिली.विशेष म्हणजे लवकरच नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. त्यामुळे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या आपल्याच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यावर राणे दावा ठोकणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 18, 2017 06:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close