नारायण राणे पुन्हा दिल्लीला रवाना

नारायण राणे पुन्हा दिल्लीला रवाना

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे पुन्हा एकदा दिल्लीला रवाना झाले आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेलला उधाण आलंय.

  • Share this:

05 एप्रिल : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे पुन्हा एकदा दिल्लीला रवाना झाले आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी राणेंनी दिल्लीला रवाना झाले आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेलला उधाण आलंय.

'भूकंप होऊन सांगत नाही' असं सूचक वक्तव्य करून नारायण राणे यांनी भाजपच्या वाटेवर असल्याचं संकेत देऊन राजकीय वातावरण तापलं. खुद्द नारायण राणे यांनी मागील आठवड्यात दिल्ली गाठली. मात्र, त्यांच्या पदरी फारसं काही पडलं नाही. रिकाम्या हाती ते राज्यात परतले आणि संघर्षयात्रेत सहभागी झाले.

संघर्षयात्रा संपल्यानंतर आता पुन्हा एकदा राणेंनी दिल्लीकडे कूच केलीये. विशेष म्हणजे तीनच दिवसांपूर्वी  राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल  सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांनी नारायण राणेंच्या घरी जाऊन भेट घेतली.

रावल यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं पण राणे यांनी या निव्वळ अफवा असल्याचं सांगून टोलवलं. आता पुन्हा राणे दिल्लीला रवाना झाले असून उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2017 06:58 PM IST

ताज्या बातम्या