संघर्षयात्रेवर टीका करणाऱ्या नारायण राणेंची आता पलटी

संघर्षयात्रेवर टीका करणाऱ्या नारायण राणेंची आता पलटी

स्वत:चाच पक्ष या संघर्षयात्रेत सहभागी असताना राणेंनी या संघर्षयात्रेच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता.

  • Share this:

17 मे : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी काढलेल्या संघर्षयात्रेबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंनी पलटी मारली. काही दिवसांपूर्वी संघर्षयात्रेवर टीका करणारे राणेंना संघर्षयात्रेत भाग घेऊन सरकारवर तोफ डागली.

संघर्षयात्रेमुळे पक्षाची बदनामी होत असल्याची टीका राणेंनी केली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी काढलेल्या संघर्षयात्रेबद्दल तिसऱ्या टप्प्यानंतर राणेंनी मतप्रदर्शन केलं. स्वत:चाच पक्ष या संघर्षयात्रेत सहभागी असताना राणेंनी या संघर्षयात्रेच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता.

संघर्षयात्रेमुळे पक्षाची बदनामी होत असल्याचं राणेंचं म्हणणं होतं. त्याच चौथ्या टप्प्यातल्या कोकणातल्या संघर्षयात्रेत त्यांनी भाग घेतला. इतकंच नाही तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील अशी गर्जनासुद्धा केली.

आता प्रश्न उरतो संघर्षयात्रेवर प्रहार करणारे राणे एवढे बदलले कसे..गेल्या काही दिवसांतल्या राणेंच्या घडामोडींकडे पाहिलं तर ते भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा होती. अहमदाबादमध्ये राणेंनी मुख्यमंत्र्यांसह अमित शहांची भेट घेतली. भाजप प्रवेशाकडे डोळे लावून बसलेल्या राणेंनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसह काँग्रेसमधल्याच नेत्यांना अंगावर घेतलं. पण राणेंची भाजपसोबतची डील जमली नाही आणि म्हणूनच त्यांना बॅकफूटवर जावं लागलं. म्हणूनच काही दिवसांपूर्वी स्वत:च्याच पक्षावर प्रहार करणारे राणे आता सरकारवर तोफ डागतायत. राजकारणात टायमिंग कधी बदलेलं हे आणि कोण कधी पलटी मारेल सांगता येणं कठीण..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2017 06:39 PM IST

ताज्या बातम्या