फडणवीसांवर 9 हजार खुनाचे गुन्हे दाखल करायचे का? -राणे

शेतकऱ्यानं आत्महत्या केली तर खुनाचा गुन्हा दाखल करा असं एकेकाळी देवेंद्र फडणवीस म्हणत होते

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 4, 2017 08:38 PM IST

फडणवीसांवर 9 हजार खुनाचे गुन्हे दाखल करायचे का? -राणे

04 एप्रिल : राज्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. मग देवेंद्र फडणवीसांवर नऊ हजार खुनाचे गुन्हे दाखल करायचे का ? असा सवाल काँग्रेसचे नेते नारायण राणेंनी उपस्थित केलाय.

पनवेलमध्ये शेतकरी संघर्षयात्रेच्या समारोपाच्या सभेत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यानं आत्महत्या केली तर खुनाचा गुन्हा दाखल करा असं एकेकाळी देवेंद्र फडणवीस म्हणत होते. विरोधात असताना त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर आरोप केले पण आता ते शेतकरी आत्महत्यांबाबत का बोलत नाही असा सवाल राणेंनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2017 08:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...