S M L

एनडीए प्रवेशाबद्दल राणे आज महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता

तर एनडीएत सामील होण्याबाबत महत्त्वाची घोषणा राणे आज करण्याची शक्यता आहे

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 6, 2017 09:39 AM IST

एनडीए प्रवेशाबद्दल राणे आज महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता

सिंधुदुर्ग,06 ऑक्टोबर: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा केल्यानंतर नारायण राणे सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले आहेत. आपल्या पक्षाची पुढची व्यूहरचना राणे आता सिंधुदुर्गात आखणार आहेत. तर एनडीएत सामील होण्याबाबत महत्त्वाची घोषणा राणे आज करण्याची शक्यता आहे.

01 ऑक्टोबरला मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेऊन राणेंनी नवीन पक्षाची घोषणा केली होती. त्यानंतर राणेंना मंत्रीपद मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होती. त्यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेटही खूप गाजली. ते एनडीएत समाविष्ट कधी होणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. आता सिंधुदुर्गात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका राणे स्वतंत्रपणे लढवणार आहेत. राणे समर्थ विकास पॅनलने या निवडणुका लढवत आहेत. नव्या पक्षाच्या कार्यकारिणीची रचना ते लवकरच जाहीर करणार आहेत. आज संध्याकाळी सिंधुदुर्गात याबाबत ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ते एनडीए मध्ये कधी समाविष्ट होतील आणि त्यांना कोणतं खातं मिळेल याची चर्चा आता सर्वत्र सुरु झालीय.

तर राणेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशाने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपत ज्यांची 3 री आणि 4 थी टर्म आहे ते आमदार यामुळे अस्वस्थ झाले आहेत. यात 7 प्रदीर्घ अनुभवी आमदार आहेत. तर काँग्रेस आणि एनसीपी मधून भाजपत आलेले आमदारही अस्वस्थ आहे. यात 15 दिग्गज आमदार आणि 4 माजी मंत्री देखील आहेत. तर सरकारने सारवासारवीचा प्रयत्न केला आहे.जर शिवसेनेला टक्करच द्यायची असेल तर आशिष शेलार, अनिल गोटे का नको असाही प्रश्नही विचारला जातोय.त्यामुळे यापुढे राणे एनडीएत प्रवेश करतात का आणि त्यानंतर त्यांचं कसं स्वागत केलं जात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 6, 2017 09:39 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close