26 सप्टेंबर: नारायण राणेंचा भाजप प्रवेश निश्चित असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात काल नारायण राणे यांनी काल भाजप अध्यक्ष अमित शहा यांची काल भेट घेतली असंं सांगितल जातंय.
काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दसऱ्याआधी आपली पुढची राजकीय वाटचाल निश्चित करणार असल्याचं राणे यांनी सांगितलं होतं. दरम्यान भाजपच्या कार्यकारिणीची एक मोठी बैठक घेण्यात आली. या बैठकीचा समारोप झाल्यानंतर राणेंनी अमित शहांची भेट घेतली. या भेटीत राणेंनी आपल्यासोबत पंचवीस आमदार असल्याचा दावा शहांकडे केल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान राणेंनी सिंधुदुर्गमधील एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमंत्रणासाठी अमित शहांची भेट घेतली असं रावसाहेब दानवेंनी सांगितलं.
त्यामुळेवरज
यापुढे आता राणे भाजपत प्रवेश कधी करणार आणि त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण काय वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा