नारायण राणेंचा दावा फोल !

मुख्यमंत्री आणि अमित शहा यांची अहमदाबादमध्ये राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल दोन तास चर्चा झाली. विशेष म्हणजे खुद्द राणेही अहमदाबादमध्येच होते

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2017 04:22 PM IST

नारायण राणेंचा दावा फोल !

13 एप्रिल : आम्ही नारायण राणे-अमित शहा आणि मुख्यमंत्री यांची भेट झाल्याचं वृत्त आयबीएन लोकमतने दिलंय. आम्ही आमच्या बातमीवर ठाम आहोत. पण नारायण राणेंनी मात्र अशी कुठली अमित शहांसोबत भेट झाल्याचं वृत्त फेटाळलंय.

नारायण राणे हे भाजपच्या उंबरठ्यावर पोहोचले. कारण मुख्यमंत्री आणि अमित शहा यांची अहमदाबादमध्ये राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल दोन तास चर्चा झाली. विशेष म्हणजे खुद्द राणेही अहमदाबादमध्येच होते. पण त्यांना शहांनी भेट दिली नसल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

एवढंच नाहीतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली. पण अहमदाबादमध्ये होतो आणि मुख्यमंत्र्यांसोबत होतो हेही नारायण राणेंनी नाकारलंय. आमच्याकडे एएनआय ह्या वृत्तसंस्थेनं जे फुटेज पाठवलेलं आहे त्यात मात्र राणे आणि मुख्यमंत्री फडणवीस हे एकाच गाडीत, एकत्र प्रवास करत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय.

राणेंच्या  दाव्यानुसार व्हिडिओही वास्तववादी नाही. नारायण राणेंनी एकंदरीतच जे काही सध्या त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे आणि तशी ठोस माहिती मिळतेय ती नाकारलीय.

परंतु, विश्वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राणेंना ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे त्यांनी घुमजाव केले असावे असा अंदाज वर्तवला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2017 04:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...