News18 Lokmat

राणेंनी पुन्हा दंड थोपटले, शिवसेना खासदाराच्या पराभवासाठी उमेदवाराचीही घोषणा

'औरंगाबादचं राजकारण पाहता सुभाष पाटील इथून निवडून येतील,' असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 9, 2019 07:51 AM IST

राणेंनी पुन्हा दंड थोपटले, शिवसेना खासदाराच्या पराभवासाठी उमेदवाराचीही घोषणा

औरंगाबाद, 9 मार्च : महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केली आहे. तसंच या मतदारसंघातून सुभाष किसनराव पाटील हे स्वाभिमानचे उमेदवार असणार आहेत.

'औरंगाबादचं राजकारण पाहता सुभाष पाटील इथून निवडून येतील,' असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. औरंगाबादला चंद्रकांत खैरे यांचा पराभव करणारच, असंही राणे म्हणाले.

कोण आहेत सुभाष पाटील?

सुभाष पाटील आधी शिवसेनेत होते, नंतर मनसे आणि त्यानंतर त्यांनी स्वतःची मराठवाडा विकास सेना स्थापन केली. आता त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला असून ते औरंगाबादमधून निवडणूक लढवतील.

दरम्यान, 'जिथं जिथं शिवसेना आहे तिथं स्वाभिमान पक्ष निवडणूक लढवणार. राज्यात किमान 5 जागा लढवणार आहे,' अशी घोषणा नारायण राणेंनी केली आहे.

Loading...

'आमच्या उमेदवाराला मत म्हणजे मोदींना मत'

'आमच्या उमेदवाराला मत म्हणजे मोदींना मत असं समजायला हरकत नाही,' असं म्हणत राणे यांनी आपण निवडणुकीनंतरही पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार असल्याचं सुचवलं आहे.

युतीवर जोरदार टीका

नारायण राणे यांनी शिवसेना-भाजप युतीवर टीका केली आहे. 'भाजप शिवसेना युती फक्त सत्ता मिळवण्यासाठी आहे, तुझं माझं जमेना, तुझ्या विना करमेना असं झालं आहे, पहिले शिव्या दिल्या आणि आता जवळ काय येताय? शिवसेनेनं काहीही काम केलं नाही, आता सत्तेसाठी फक्त युती केली,'असा घणाघात नारायण राणेंनी केला आहे.


VIDEO: राज्यसभेच्या चर्चांवर विखे पाटील म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2019 07:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...