नारायण राणे राज्यसभेवर जाणार, भाजपची ऑफर स्विकारली

नारायण राणे राज्यसभेवर जाणार, भाजपची ऑफर स्विकारली

काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत राणेंना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यसभेची ऑफर दिली होती.

  • Share this:

10 मार्च : महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे अखेर भाजपच्या राज्यसभेसाठी होकार दर्शवलाय. राणे सोमवारी राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज दाखल करणार आहे.

भाजपमध्ये सामील होण्यासाठी नारायण राणेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राणेंनी स्वाभिमान महाराष्ट्र नावाचा पक्ष स्थापन केला आणि त्यानंतर राणेंचा पक्षा एनडीएत सहभागी झाला तेंव्हा पासून राणे हे मंत्रिपदासाठी ताटकळत होते.

भाजपनं वेळोवेळी त्यांना आश्वासनांवर आश्वासनं दिली. मात्र काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत राणेंना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यसभेची ऑफर दिली होती. राणेंनी थोडा वेळ घेत अखेर आपला निर्णय पक्का केलाय. आज राणेंनी राज्यसभेची ही ऑफर स्वीकारली. त्यामुळे नारायण राणे आता राज्यसभेवर जाणार हे स्पष्ट झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 10, 2018 10:00 PM IST

ताज्या बातम्या