संघर्ष यात्रेच्या समारोपालाही राणेंची पाठ, भाजप प्रवेशाबाबत चर्चेला उधाण

संघर्ष यात्रेच्या समारोपालाही राणेंची पाठ, भाजप प्रवेशाबाबत चर्चेला उधाण

  • Share this:

18 एप्रिल :  संघर्ष यात्रेचा दुसरा टप्प्याचा आज समारोप होत आहे, या संपूर्ण यात्रेत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी दांडी मारलीय.

विशेष म्हणजे संघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्यात राणे शेवटी का होईना आले होते. त्यावेळेस फडणवीसांच्या विरोधात 9 हजार शेतकर्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तेच राणे आता आहेत तरी कुठे ? असा सवाल निर्माण होतोय.

भाजपतल्या संभाव्य प्रवेशामुळेच राणे यांचा राज्यसरकार विरोधातील धार कमी झाला की काय असा सवाल आता विचारला जातोय.

दरम्यान, नारायण राणेनी उद्या दुपारी तीन वाजता सिंधुदुर्ग नगरी येथे जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. संभाव्य पक्षांतराबाबत राणे काही बोलतात का याबाबत उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2017 01:52 PM IST

ताज्या बातम्या