S M L

कंत्राटदाराच्या पैशांवर जिल्हा परिषदेच्या चपराशाची थायलंडमध्ये मौजमजा

धक्कादायक म्हणजे या लोकांनी जिल्हा परिषदेला परदेशी जात असल्याच कुठलीही सुचना दिली नाही.

Sachin Salve | Updated On: May 2, 2018 05:06 PM IST

कंत्राटदाराच्या पैशांवर जिल्हा परिषदेच्या चपराशाची थायलंडमध्ये मौजमजा

प्रवीण मुधोळकर, नागपूर

नागपूर, 02 मे : नागपूर जिल्हा परिषदेचे 25 अधिकारी आणि कर्मचारी कंत्राटदारांच्या पैशांनी आठवडाभराच्या थायलंड वारीवर जाऊन आल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे या लोकांनी जिल्हा परिषदेला परदेशी जात असल्याच कुठलीही सुचना दिली नाही. आता या परदेशवारीची हे अधिकारी कंत्राटदारासाठी कशी परतफेड करणार आहेत असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय.

या व्हिडिओत थायलंड मध्ये परदेशी महिलांसोबत फोटो काढणारे हे लोक जिल्हा परिषद नागपूरच्या बांधकाम खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी आहेत. याच विभागातील चपराशी शैलेष झोकने सह फोटोत दिसत असलेला सचिन मानकर हा कंत्राटदाराने ह्या दौऱ्याचा आयोजक आहे. पण हा दौरा महिन्याकाठी जमा केलेल्या शे दोनशे रुपयांनी जमलेल्या पैशातून केल्याच या लोकाच म्हणणं आहे.पण जिल्हा परिषदेला परदेशात जातांना या लोकांनी कुठलीही सुचना दिली नाही. या लोकांनी उत्साहाच्या भरात आपल्या मौजमजेचे फोटो आणि व्हिडिओ व्हाॅट्सअॅप ग्रुपवर टाकले आणि हा प्रकार उघड झाला. आता या लोकांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ज्या कंत्राटदाराने पन्नास लाख रुपये खर्च करून हा संपुर्ण दौरा आयोजित केला त्या कंत्राटदाराला जिल्हा परिषदेची तिजोरी रिकामी करण्यासाठी हेच अधिकारी परतफेड म्हणून मदत तर करत नाहीये ना असा सवाल सामान्यांच्या मनात उपस्थित झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2018 05:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close