S M L

नांगरे पाटलांना पुणे फेस्टिव्हलला डेसिबल दिसले नाही का ? -उदयनराजे

Updated On: Sep 14, 2018 03:10 PM IST

नांगरे पाटलांना पुणे फेस्टिव्हलला डेसिबल दिसले नाही का ? -उदयनराजे

विकास भोसले, सातारा, 14 सप्टेंबर : डॅाल्बीने प्रदूषण होतंय तर राज्यातील कंपन्यांच्या प्रदुषणाचे काय?, विश्वास नांगरे पाटील यांना पुणे फेस्टिव्हल डेसिबल दिसला नाही का ? असा सवाल साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलाय. तसंच मंगळवार तळे माझ्या मालकीचे तिथे काय करायचे काय नाही ते मी ठरवणार कंटेंट ऑफ कोर्ट होऊच शकत नाही आणि झाला तर तो माझ्यावर होईल अशा इशाराही उदयनराजेंनी दिला.

गणेशोत्सवदरम्यान, कोर्टाच्या आदेशानुसार डाॅल्बीवर मर्यादा घालण्यात आलीये. कोल्हापूर, सातारा परिसरात पोलिसांनी पहिल्याच दिवशी कारवाई करून सात लाखांचे डाॅल्बी सेट जप्त केले आहे. 'जब तक है जान तब तक डाॅल्बी वाजणार', असा इशारा देणारे खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतापले. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा सरकारला इशारा दिलाय.

डेसिबलची मर्यादा घालून डॉल्बीला मंजुरी द्यायला हवी. इथं तरुणांना रोजगार मिळत नाही. काही तरूण हे कसेबसे कर्ज काढून डॅाल्बी घेतलाय. आता त्यांच्यावर जप्ती आलीय याला जबाबदार कोण? त्या पोरांनी कर्ज कसं फेडायचं ?, असा सवाल राजेंनी उपस्थितीत केला.

मला अटक करायचे सोडून दया, मी जनतेसाठी काहीही करू शकतो. डॅाल्बीने प्रदूषण होतंय तर राज्यातील कंपन्यांच्या प्रदुषणाचे काय?, विश्वास नांगरे पाटील यांना पुणे फेस्टिव्हल डेसिबल दिसला नाही का ? असा सवालच राजेंनी नांगरे पाटलांना विचारलाय. जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा राजेंनी दिला,

तसंच सातारा गणेश विसर्जन मंगळवार तळे येथेच होणार आहे. या बाबत कारण नसताना प्रसासनाने गोधळ घातलाय.

तळ्याच्या बाबतीत काहीही शंका बाळगू नका मंगळवार तळ्यातच विसर्जन होणार जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही खा.उदयनराजेंची पुन्हा एकदा प्रशासनाला दिलाय.

याआधीही उदयनराजेंनी प्रशासनाला इशारा दिला होता.

उदयनराजे म्हणतात, २३ तारखेला विसर्जन आहे तेव्हा पाहू काय होतं आणि काय नाही होतं आणि कसं नाही होत. डॉल्बी लागलीच पाहिजेत, डेसीमल ठरवणारे कोर्ट आणि पोलिस डिपार्टमेंट कोण? डेसीमल ठरवतात तुमच्या आमच्यासारखे अवली लोक.

खऱ्या अर्थाने आम्ही गणपतीचे भक्त आहोत. गणपतीला त्रास होत नाही तर इतरांना त्रास व्हायचं काही कारणच नाही. त्रास तरीही झालाच तर एक दोन दिवस सहन करायला काही जात नाही.

मोठ्या आवाजाने बिल्डींग पडतात.. हे पडतं... ते पडतं... या साऱ्या गोष्टी खोट्या आहेत. उलट जुन्या इमारती पाडण्यासाठी याचा वापर करा. जुन्या इमारतींची डागडुजी करत नाहीत. मात्र

तुम्ही बिचाऱ्या "सुसंस्कृत पोरांचे" हट्ट ऐकत नाहीत. मग काय करायचं हे पाहिलं जाईल.

ही धमकी नाही तर ही मी समज देतोय, प्लॅन करा नाहीतर तुम्ही कोणत्याही कोर्टात जावा डॉल्बी तर असणारच आहे. जब तक है जान तब तक डॉल्बी रहेगी... जब तक डॉल्बी रहेगी तब तक गणपती रहेगा. एवढंच सांगतो आता बोलायची वेळ नाही.

उदयनराजेंच्या इशाऱ्यानंतर नांगरे पाटलांनीही जशास तसे उत्तर दिले होते.

लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांच्यात संघर्ष करण्याची आमची भूमिका नाही. कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आम्ही कार्य करतो. त्यामुळे डीजेबाबत आम्ही पहिल्यांदा जागृती, शिक्षण आणि नंतर अंमलबजावणी या टप्प्याने आम्ही काम करतोय. पर्यावरण संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याचे सुप्रीम आणि हायकोर्टाचे आदेश आहेत. त्यात पाच वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे अशी आठवण नांगरे पाटलांनी करून दिली.

मी स्वतः गणेशभक्त आहे. त्यामुळे कोणत्याही गणेश भक्तावर कारवाई करण्याची आमची इच्छा नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

============================================

PHOTOS : उदयनराजेंचा नादखुळा, शहरात चालवला कचऱ्याचा डंपर !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 14, 2018 03:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close