हिना गावित यांच्यानंतर नंदुरबारमध्ये आयपीएस अधिकाऱ्यावर विद्यार्थ्यांचा हल्ला

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2018 08:26 PM IST

हिना गावित यांच्यानंतर नंदुरबारमध्ये आयपीएस अधिकाऱ्यावर विद्यार्थ्यांचा हल्ला

नंदुरबार, 06 आॅगस्ट : खासदार हिना गावित यांच्या गाडीवर मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलकांनी गाडीवर चढून तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच आता आदिवासी विद्यार्थ्यांनी एका आयएस महिला अधिकाऱ्याच्या गाडीवर हल्ला केला. विद्यार्थ्यांनी गाडीवर चढून तोडफोड केली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वानमंती सी या गाडीत होत्या.

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहात डीबीटी योजना सुरू करण्यात आलीये. मात्र विद्यार्थ्यांचा याला विरोध होता. याच विरोधात आज विद्यार्थ्यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालयाबाहेर आंदोलन केलं.

यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी वानमंती सी यांच्या गाडीला टार्गेट केलं. विद्यार्थ्यांनी वानंमती सी यांच्या गाडीवर चढून गाडीच्या काचा फोडल्या. यावेळी गाडीत वानंमती सी होत्या. काही आंदोलक विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाहनावर चढून तोडफोड केली. तिथे उपस्थितीत असलेल्या पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांच्या गराड्यातून त्यांना बाहेर काढलं. या तोडफोडीत गाडीच्या काचा फुटला आणि गाडीचे नुकसान झालं.

रविवारीच मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलकांनी खासदार हिना गावित यांच्या गाडीवर चढून असाच हल्ला केला होता. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज नंदुरबाद बंद पुकारण्यात आला होता. तसंच हिना गावित यांनी लोकसभेतही निवदेन देऊन हल्लेखोरांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. दरम्यान, हिना गावित यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मराठा क्रांती मोर्चा समितीने हिना गावित यांची जाहीर माफी मागितली.

-------------------------------------------

हेही वाचा

VIDEO : लोकसभेतलं हिना गावितांचं संपूर्ण भाषण

शनाया घेणार गुरूचा कायमचा निरोप

VIDEO :हिना गावित यांच्यावर हल्ल्याबद्दल मराठा आंदोलक म्हणतात...

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2018 08:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close