औरंगबाद महापालिकेच्या महापौरपदी नंदकुमार घोडिले

महापालिकेत सेना भाजपची युती असल्यानं निवड जवळपास निश्चित होती. सेना भाजप आणि काही अपक्ष मिळून सेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर यांना प्रत्येकी 114 पैकी 77 मतं पडली

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 29, 2017 07:30 PM IST

औरंगबाद महापालिकेच्या महापौरपदी नंदकुमार घोडिले

औरंगाबाद,29 ऑक्टोबर: औरंगाबाद महापालिकेच्या महापौर उपमहापौर या पदांसाठी मतदान घेण्यात आलं. शिवसेनेचे नंदकुमार घोडिले महापौर तर भाजपचे विलास औताडे उप महापौर म्हणून निवडून आले.

महापालिकेत सेना भाजपची युती असल्यानं निवड जवळपास निश्चित होती. सेना भाजप आणि काही अपक्ष मिळून सेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर यांना प्रत्येकी 114 पैकी 77 मतं पडली. सेना भाजप यांची युती असल्यानं 4 वर्ष शिवसेना आणि एक वर्ष भाजप हा फॉर्म्युला ठरला आहे. सुरुवातीला सेनेनं दोन वर्षं महापौर पद घेतले त्यानंतर भाजपला एक वर्ष दिलं आणि सेना पुन्हा दोन वर्ष महापौरपद स्वत:कडे ठेवेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 29, 2017 07:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close