नांदेड काँग्रेसमय, 69 जागा जिंकल्यात

नांदेड-वाघाळा महापालिकेवर पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकलाय

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 12, 2017 09:15 PM IST

नांदेड काँग्रेसमय, 69 जागा जिंकल्यात

नांदेड,12 ऑक्टोबर: नांदेड म्हणजे अशोक चव्हाण...हे समीकरण पुन्हा एकदा सिद्ध झालंय. नांदेड-वाघाळा महापालिकेवर पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकलाय. काँग्रेसने घसघशीत बहुमत मिळवत एकहाती सत्ता राखलीये. भाजपने सत्ता मिळवण्याची पूर्ण ताकद पणाला लावली पण चव्हाणांच्या गडाची वीट सुद्धा भाजपला हलवता आली नाही. तर एमएआयएमने केलेला शिरकाव यावेळी मुस्लिम मतदारांनीच हाणून पाडत काँग्रेसला साथ दिलीये.

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीची ८१ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासून काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आणि ही आघाडी आता विजयात बदलली आहे. 69 जागांवर काँग्रेस विजयी झालंय तर भाजप आणि सेनेच्या वाट्याला प्रत्येकी 1 जागा आलीये.

एमआयएमचा धुव्वा

दुसरीकडे मागील निवडणुकीत हैदराबादमधून नांदेडमध्ये शिरकाव केलेल्या एमआयएमचा पार धुव्वा उडाला. मागील निवडणुकीत एमआयएमला 11 जागा मिळाल्या होत्या. नांदेडमध्ये या विजयामुळे राज्याच्या राजकारणात एमएआयएमची चर्चेनं जोर धरला होता. पण, आज मतदारराजांनी ज्या प्रकारे एमआयएमला संधी दिली होती तसाच 'हात'ही दाखवलाय. एमएआयएमला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.

राष्ट्रवादी शुन्यावर आऊट

Loading...

तर हीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची झालीये. एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत पुरता धुव्वा उडालाय. राष्ट्रवादीलाही भोपळा फोडता आला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2017 02:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...