News18 Lokmat

अशोक चव्हाणांना धक्का, नगरपरिषदेवर भाजपची सत्ता

नांदेडची लोहा नगर परिषद भाजपच्या खात्यात आली आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी ही जागा जिंकली आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 10, 2018 12:50 PM IST

अशोक चव्हाणांना धक्का, नगरपरिषदेवर भाजपची सत्ता

नांदेड, 10 डिसेंबर : नांदेडची लोहा नगरपरिषद भाजपच्या खात्यात आली आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी ही जागा जिंकली आहे. तर यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हानांना मोठा धक्का बसला असं म्हणायला हरकत नाही.

लोहा नगर परिषदेच्या 17 जागांपैकी 13 जागांवर भाजपने सत्ता स्थापन केली आहे तर फक्त 4 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे गजानन सूर्यवंशी विजयी झाले आहेत तर काँग्रेसचे सोनू संगेवार हे पराभूत झाले आहेत. या सगळ्या आकड्यांमुळे नांदेडमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. तर तिकडे धुळे आणि अहमदनगरमध्ये महापालिकांचे निकाल आता अंतिम टप्प्यात आले आहेत.

तर चंद्रपुरमध्ये मात्र काँग्रेस आपली सत्ता स्थापन करण्यासाठी यशस्वी झाली आहे. ब्रम्हपुरी नगरपरिषदेवर कांग्रेसने आपला झेंडा रोवला आहे. नगराध्यपदाच्या निवडणुकीत कांग्रेसच्या रीता उराडे 1600 मतांनी विजयी झाल्या आहेत.  ब्रम्हपुरी नगरपरिषद निवडणूक निकालात 20 पैकी 12 काँग्रेस,  भाजप  3 अपक्ष तर  5 इतर अशी लढत आहे. विधानसभेतले कांग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांना नगरपरिषदेवर वर्चस्व मिळवण्यात यश आलं आहे.


धुळे महापालिकेचे संपूर्ण निकाल पाहण्यासाठी क्लिक करा...धुळे महापालिका निवडणूक LIVE : 43 जागांवर आघाडी मिळाली, गिरीश महाजनांचा दावा

Loading...


अहमदनगर महापालिकेचे संपूर्ण निकाल पाहण्यासाठी क्लिक करा...अहमदनगर महापालिका निवडणूक LIVE : काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपला रोखलं


VIDEO : जेव्हा पवार आजोबा नातीच्या गाडीतून घरी जातात


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 10, 2018 12:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...