पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा नदीत बुडून मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा नदीत बुडून मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा मांजरा नदीन बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी बिलोली तालुक्यात घडली.

  • Share this:

नांदेड, 11 नोव्हेंबर : पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा मांजरा नदीन बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी बिलोली तालुक्यात घडली. शेख इफतेखार (वय 20) आणि नवाज कुरेशी (वय 21) अशी या मृत पावलेल्या युवकांची नावे आहेत.


शेख इफतेखार आणि नवाज कुरेशी हे दोघेही बिलोली तालुक्यातील कासराळी येथील रहिवासी आहेत. रविवारी दोघेही नदीवर पोहण्यासाठी गेले होते. नदीच्या पात्रात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने शेख इफतेखार बुडायला लागला. शेख बुडत असल्याचं पाहून, नवाज त्याच्या मदतीसाठी धावला. पण, पाण्यात भोवरा असल्यामुळे त्यांना बाहेर पडणं अशक्य झालं आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला.


पोहण्यासाठी आलेले दोन युवक बुडाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोवर फार उशीर झाला होता. प्रत्यक्षदर्शींनी दोघांच्याही कुटुंबियांना ही दुःखद वार्ता दिली. एन तारुण्यात मुलं गेल्याने शेख आणि नवाज यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर कासराळी गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच बिलोली पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले व उत्तरीय तपासणीसाठी पाठवे. या प्रकरणाचा पोलीस अधीस तपास करीत आहेत.

Loading...


 VIDEO : 'आमची आई कुठे आहे?'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2018 08:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...