बळीराजाचा आक्रोश, उभ्या पिकांवर फिरवला नांगर !

उत्पादन कमी आले असतांनाही महसूल विभागाने 51 पैसे आणेवारी जाहीर केली

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 13, 2017 09:09 PM IST

बळीराजाचा आक्रोश, उभ्या पिकांवर फिरवला नांगर !

13 नोव्हेंबर : नांदेड जिल्ह्यातील माळाकोळी गावातील शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या उभ्या पिकांवर नांगर फिरवला. उत्पादन कमी आले असतांनाही महसूल विभागाने 51 पैसे आणेवारी जाहीर केली. शासनाचा निषेध म्हणून वाजंत्री लावून वाजत गाजत शेतात जाऊन शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त केलं.

नांदेड जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून दुष्काळ आहे. यावर्षीही अनियमीत पावसामुळे सोयाबीन, मुग, उडीद, ज्वारी,  पुर्णपणे तर कापुस आणि  तुर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न निम्याहुन कमी होत आहे. तरीही येथील आणेवारी 51 टक्के काढली गेली आहे. शिवाय शेतीमालाला भाव नाही. यामुळे माळाकोळी येथील संतप्त  शेतकर्यांनी शासन आणि प्रशासनाच्या निषेधार्थ वाजंत्री लावून वाजत गाजत शेतातील उभ्या सोयाबीन पिकावर नांगर फिरवला.

एकरी पंधरा ते अठरा हजार रुपये उत्पादन खर्च, तर उत्पन्न हे एकरी दीड ते दोन क्विंटल झाले. म्हणजेच पाच ते साडेपाच हजार रुपये उत्पन्न होत असल्यामुळे येथील शेतकरी अडचणीत आला आहे. अंदाजे शंभर एकर जमिनीवरील सोयाबीन पिकाची काढणी न करता नांगर फिरवला.

शासन प्रशासनाच्या चुकीची आणेवारी काढणे, शेतीमालाला भाव नसणे या विरोधात निषेध म्हणून शेतकऱ्यांनी आपली शेतीच उद्ध्वस्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2017 09:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...