नांदेडमध्ये महापालिकेसाठी मतदान सुरू

नांदेडमध्ये महापालिकेसाठी मतदान सुरू

नांदेड महापालिकेची निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरते आहे. भाजपनं मुख्यमंत्र्यांसह अनेक बड्या नेत्यांना प्रचारात उतरवलं होतं. सध्याची स्थिती बघितली तर 81 जागा असलेल्या नांदेड महापालिकेत भाजपच्या दोनच जागा आहेत, तर काँग्रेसकडे 41 नगरसेवक आहेत

  • Share this:

नांदेड,11 ऑक्टोबर:नांदेड महापालिकेसाठीचं मतदान सुरू झालंय. राजकीय दृष्ट्या बघायला गेलं तर ही निवडणुक अत्यंत महत्त्वाची आहे. कारण अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात मजल मारण्याचा भाजपचा प्रयत्न करणार आहे.

नांदेड महापालिकेची निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरते आहे. भाजपनं मुख्यमंत्र्यांसह अनेक बड्या नेत्यांना प्रचारात उतरवलं होतं. सध्याची स्थिती बघितली तर 81 जागा असलेल्या नांदेड महापालिकेत भाजपच्या दोनच जागा आहेत, तर काँग्रेसकडे 41 नगरसेवक आहेत. तर एमआयएमकडे 11 आणि शिवसेनेकडे 12 नगरसेवक आहेत. यंदा निवडणुक जिंकणे अशोक चव्हाणांसाठी महत्तवाचं ठरणार आहे. राहुल गांधीही काही दिवसांपूर्वी येऊन कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवून गेले होते. तर भाजपनेही आपली सगळी ताकद या निवडणुकीत लावली आहे.

त्यामुळे इथली परिस्थिती आहे तशीच राहते की चित्र पालटते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

2017 निवडणूक

एकूण जागा 81

एकूण उमेदवार - 578

एकूण मतदार - 3 लाख 96 हजार 872

स्त्री मतदार - 1 लाख 90 हजार 408

पुरुष मतदार- 2 लाख 6 हजार 421

चार उमेदवारांचे 20 प्रभाग आणि 5 उमेदवारांचा एक प्रभाग

एकूण मतदान केंद्र 550

संवेदनशील मतदान केंद्र - 130

215 इमारतींमध्ये मतदान

एकूण उमेदवार - 578

मतदान प्रक्रियेसाठी एकूण 312 अधिकारी

मतदानासाठी 3361 कर्मचारी नियुक्त

एकूण 2 हजार 500 बॅलेट युनिट, 800 कंट्रोल युनिट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2017 09:15 AM IST

ताज्या बातम्या