डॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम!

डॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम!

नांदेडमध्ये नितीन जोशी या डॉक्टरांनी चक्क स्वत: चीच एनडोस्कोपी करून वैद्यकीय क्षेत्रात एक नवीन विक्रम केलाय.

  • Share this:

नांदेड, 18 ऑक्टोबर : नांदेडमध्ये नितीन जोशी या डॉक्टरांनी चक्क स्वत: चीच एनडोस्कोपी करून वैद्यकीय क्षेत्रात एक नवीन विक्रम केलाय. भारतात पहील्यांदाच ही किमया झालीय आणि तीही कुठल्याही प्रकारची भूल न देता. डॉक्टर जोशी यांनी उभे राहून स्वत:ची एन्डोस्कोपी केली. अशा प्रकारे भारतात एखादया डॉक्टरने स्वताची एन्डोस्कोपी करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मानले जाते. डॉक्टर नितीन जोशी यांनी आतापर्यंत सात हजारहून अधीक रुग्णांची एन्डोस्कोपी केलीय. एन्डोस्कोपी करताना रुग्णाला काय त्रास होते, याचा अनुभव यावा यासाठी आपण स्वतावर एन्डोस्कोपी केली असे ते सांगतात.

मानवी शरीरातील पचनसंस्थेतील विकार जाणून घेण्यासाठी दुर्बिणीद्वारे रुग्णाची एनडोस्कोपी केली जाते. पण नांदेड मधील डॉक्टर नितीन जोशी यांनी स्वत: चीच एनडोस्कोपी करून वैद्यकीय क्षेत्रात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. भारतात पहिल्यांदाच डॉक्टरने ही किमया केलीये. मानवी शरीरातील पचनसंस्थेतील आणि आतड्यांमधील नेमक्या विकाराचे निदान करण्यासाठी दुर्बिणीद्वारे एनडोस्कोपी करण्याची प्रगत पद्धती सध्या अवलंबली जाते. पोटातील विकार शोधण्यासाठी ही पध्दत वैद्यकीय क्षेत्रासाठी वरदान ठरत आहे. भूल देऊन किंवा भूल न देता तोंडाद्वारे एन्डोस्कोपी केली जाते. निष्णात गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजिस्ट डॉक्टरच ही तपासणी करतात.

डॉक्टरांनी स्वतावरच एन्डोसकोपी केल्याचा प्रयोग कधी केल्याचे ऐकिवात नाही. पण नांदेड मधील गॅलक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर नितीन जोशी यांनी स्वत: चीच एनडोस्कोपी करण्याचा प्रयोग यशस्वी केला. कुठल्याही प्रकारची भूल न देता ते ही उभे राहून डॉक्टर जोशी यांनी स्वताची एन्डोस्कोपी केली. अश्या प्रकारे भारतात एखादया डॉक्टरने स्वताची एन्डोस्कोपी करण्याची ही पहिली वेळ असल्याचे मानले जात आहे.

डॉक्टर नितीन जोशी यांनी आतापर्यंत सात हजारहून अधिक रुग्णाची एन्डोस्कोपी केली आहे. एन्डोस्कोपी करताना रुग्णाला काय त्रास होते याचा अनुभव डॉक्टरला यावा यासाठी आपण स्वतावर हा प्रयोग केल्याचे डॉक्टर नितीन जोशी यांनी सांगीतले. डॉक्टर जोशी यांच्या हा प्रयोग वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी उपलब्धी मानली जात आहे.

 मीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2018 11:46 PM IST

ताज्या बातम्या